Saturday, February 29, 2020

समुद्र


एक ८० वर्षाचा म्हातारा समुद्राच्या किनारी राहत होता. त्याच्या गावात त्याला खूप प्रतिष्ठा होती. आपलं छोटंसं घर आणि छोटीशी शेती यावर तो जाम खुश होता. तो दररोज शेतातील काम करत असे आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करत, परंतू समुद्राला हे पहावत नव्हत.  समुद्राला आपल्या विशालतेवर खूप गर्व होता. 

एके दिवशी समुद्र त्या महाशयांना म्हणाला "तू स्वतःला खूप कर्तुत्ववान समजतोस का रे? या जगावर अधिराज्य करण्याचा अधिकार माझा आहे आणि या गावावरदेखील! आता मी हे गांव बुडवून टाकणार आहे आणि त्याची सुरुवात तुझ्यापासून करणार! मी तुला बुडवनार.. तुझी शेती, तुझं घर.. तुझी प्रत्येक गोष्ट बुडवनार... तुझं कर्तुत्व बुडवनार... मी समुद्र आहे.. हा हा हा.... "

इतक्यात ते महाशय आपल्या झोपडीत गेले आणि घरातून एक वाटीभर तेल आणले आणि समुद्रात टाकले... आणि म्हणाले... "बुडवून दाखव!"

- गणेश आटकळे 
 15-12-2019