Friday, December 6, 2019

ती

ती माझ्याकडं बघायची..
हसून लाजायची,
लाजुन हसायची...
केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला
माझ्या अगदी जवळ उभी रहायची
एक्सपेरिमेंटचं आउटपुट नाही आलं तर
मला विचारायची...
अन् माझ्या अजून जवळ यायची..
जाताना माझ्याकडून
जर्नल घेवून जायची ...

तिला मी आवडलो होतो,
तेव्हाच जानले मीही...
ती सतत माझ्याशी बोलायला
पहायची..
हसून लाजायची,
लाजुन हसायची...
माझ्या बोलण्यात ती
कायमच तिच्या
प्रेमाचा होकर शोधायची...
कॉलेजात-लॅबमध्ये ती मला
सारखी सारखी भेटायची...
परवा मी
लायब्ररीत वाचत बसलो होतो...
एकटा मी अन् एकटी तीही...
मीच ठरवलं, बोलावं मनातलं अन्
ठेवावं लग्नाचं मागणं तिच्यासमोर...
तेव्हाच ती माझ्या समोर आली...
अचानक गंभीर झाली...
अन्
तिनं मला माझी जात विचारली!

- गणेश