Friday, November 29, 2019

शस्त्र

सुचत नव्हतं त्याला
करावं काय...
जाहला फार होता
बिचाऱ्यावर अन्याय...
पाटलाकडं गेला,
गावच्या मुखियाकडं गेला, पोलिसांत गेला,
कोणाचाच मिळाला त्याला नाही आधार होता
अन्यायाविरुद्धची लढा लढण्यासाठी
सुचत नव्हतं त्याला
करावं काय..

गडी तो, शोधत होता
रामबाण अन एक जालीम उपाय..
हत्याराची दुकाने असलेल्या
गल्लीत भटकत शोधत
होता एक धारदार शस्त्र...
दुरावले सारे मित्र,
कोणीही काही देईना त्याला
पाहून त्याची फाटलेली वस्त्र...
त्याने मग एक भयाण
जंगल गाठलं,
आपल्या गाठोड्यातून
मग कागद अन लेखणीला
बाहेर काढलं....!

- गणेश