Thursday, October 10, 2019

शोधक - नवे पुस्तक

मला मनाला जरा वेगळं वाटलेलं कागदावर उतरवण्याची आवड मी शाळेत असल्यापासूनची. आज त्याला आणखी वेगळं रूप मिळालेलं आहे. मला वाटलंही नव्हतं कधी ते पुस्तक रूपात अवतरेल म्हणून! पण हे शक्य होत आहे 'साहित्य चपराकमुळे'! 

चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी माझे काही लेख साप्ताहिकात आणि मासिकात प्रकशित केले आहेत आणि यामुळेच माझ्या लेखनाला हे एक भक्कम व्यसपीठ मिळालं. माझ्या काही कविता मी एकदा संपादकांना दाखवल्या. त्यांनी त्या वाचल्या आणि क्षणात सांगितले की आपण याचे पुस्तक करू शकतो आणि काही दिवसातच जन्म झाला विचारांनी जड असणाऱ्या या माझ्या शब्दाच्या गाठोड्याचा!!