Thursday, October 31, 2019

शरदचंद्र पवार...यशवंतरावांच्या तालमीतून
घडला प्रगतीचा अंगार...
ध्यास एकात्मतेचा, शेतकरी-मजूरांचा आधार...
बळ देतो तरुणांना, प्रगतशील महराष्ट्राचे
स्वप्न करण्या साकार..
उभा ठाकला शरदचंद्र पवार...

प्रवाह राष्ट्रवादाचा, पूरोगामीत्वाचा विचार...
रणनिती राजकारणाची आखुणी,
कधी मावळा तो शिवरायांचा
झाला दिल्लीवर स्वॉर...
आधारवड शेतकऱ्यांचा,
उभा ठाकला शरदचंद्र पवार...

बहुत माजले सांड रणातले,
परी जो शत्रुपुढे  छाती काढून उभारला...
विरोधकाच्या तलवारीचा
निधड्या छातीवर झेलीत वार...
महाराष्ट्राच्या विकासासाठी
ऊभा ठाकला  शरदचंद्र पवार...

- गणेश
28-10-2019