Monday, October 21, 2019

इक्झीट पोलचं तुनतूनं...

कधी तुम्हीही जाणलं असेल
पोरगाही सांगत नाही बापाला
आपलं मत निवडणूकीचं...
मिडीयाचं मात्र कायमच
वाजत राहतं इक्झीट पोलचं तुनतूनं...

नोटाचा पर्याय दिला
बदल आणला ,
काय उपयोग झाला..?
तरीही
मतदानाचा टक्का नाही वाढला...

हॅक झालेल्या EVM पचाव्या
म्हणूनच जणू इक्झीट पोल
जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी आहे...
जरा विचार करा, गड्यांनो
लोकशाही आता ही सडली आहे...
नासली आहे...

- गणेश