Sunday, September 29, 2019

मी बुद्ध पाहिला होता.

शोधत पुन्हा मी मजला नव्याने
चाललो होतो,
तू पणा, मी पणा जिथं मी विसरला होता..
जेव्हा मी बुद्ध पाहिला होता...


प्रज्ञा, शील, करुणा, शांती,
सत्याला अन् प्रामाणिकपणा
मी अंगिकारला होता,
तेव्हा लोभ, क्रोध
अन् अहंकारही गळून पडला होता...
जेव्हा मी बुद्ध पाहिला होता...

दु:खाचे कारण उमगले अन्
सत्य पाहण्याचा
सम्यक दृष्टिकोण मिळाला होता...
जेव्हा मी बुद्ध पाहिला होता...

बुद्धाच्या ज्या वाटेवर मी चालत होतो,
ज्या रांगेत मी उभा होतो, आज मी
त्या रांगेत हिटलरही पाहिला होता!