Friday, September 20, 2019

आजचा महाराष्ट्र..

कधी महाराष्ट्र घडला, कधी बिघडला...
निवडणुका झाल्या,
ईव्हीएम येवून लोकशाहीच्या उरावर बसल्या..
धनगर पेटला.. मराठा पेटला...
कोरेगांव-भीमा किस्सा कोणी घडवला?
जरी सरकार जुने गेले... नवे आले....
पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार झाले..
अन् ईव्हीएमकडून लोकशाहीवर
डोळ्यादेखत बलात्कार झाले...
होत राहीले..
घोटाळे सारे उघडे झाले..
अन नेते काही नागडे झाले....
कुणी जलसिंचन घेतला, कुणी घरकुल घेतला...
कधी वृक्ष ते तेहत्तीस कोटी...
कधी आंगनवाडीलाही मिळाली नाही चिक्की...
आभाळ दाटले.. पाऊस पडला...
या सगळया राड्यात...
वरती सर्जिकल स्ट्राईक घडवला...
यातच सर्वांनी मंत्रालयात
मेलेला धर्माआबा विसरला..
काय दीसांनी कृष्णामाई रागावली...
की जणू पश्चिम महाराष्ट्र
म्हणून तुंबवून ठेवली?
विदर्भ वाचला...
अन् मराठवाडा दुष्काळात
पुन्हा तसा......च  होरपळा...
नेता कसला बेडूक तो...
मोसमात या बेडूक उड्या चालू झाल्या..
'मी रडल्यागत करतो,
तू मारल्यागत कर'...
'पावसाळा आहे, जरा मोठ्याने
डराव डराव कर...
तू या डबऱ्यात उडी मार..
मी त्या डबऱ्यात उडी मारतो..'
या सगळ्याचा मिडिया बाजार मांडत
 टीआरपी करते...
अन् निवडणूक जवळ आली की निर्लज्ज जनता मात्र एका चपटीला भूलते...

- गणेश
16-09-19.