Saturday, June 8, 2019

राष्ट्र

अंधश्रद्धेला फेकून वेशीबाहेर
ज्ञानाची आस धरू,

विवेकपणा घेऊन माथी
विज्ञानाची कास धरू...

वाचन-लेखन करून
सुराज्याचा ध्यास करू,

गहाण राहिलेल्या मेंदूचा
प्रबोधनातून विकास करू..

जातीभेद विसरू सकळ
माणुसकीवर विश्वास करू,
हेवा वाटेल जगाला
अभे असे राष्ट्र करू..

- गणेश.