Saturday, April 13, 2019

कॉम्प्युटर व्हायरस आणि घातक सॉफ्टवेअर्स..

व्हायरस हा शब्द वैद्यकीय क्षेत्रातून संगणक क्षेत्रात आला आहे. व्हायरस म्हणजे विषाणू. अर्थात व्हायरस हा शब्द आजारापुरता मर्यादित राहिलेला नाही. मग हा व्हायरस मोबाईल किंवा संगणकाला लागतो म्हणजे नेमकं काय होतं ? बऱ्याचवेळा असाही प्रश्न आपल्याला पडतो. एखाद्या मोबाईलला किंवा कॉम्पुटरला किंवा किंवा कॉम्प्युटर नेटवर्कला हानी पोहचवणाऱ्या प्रोग्रामला किंवा सॉफ्टवेअरला व्हायरस म्हणतात. व्हायरस बनवण्याचे काम मूळतः हॅकर्स करत असतात. ज्या उपकरणांमधून मोबाईल, कॉम्पुटरमधल्या माहितीची देवाणघेवाण होते अशा उपकरणामधून व्हायरस आपल्या मोबाईल, कॉम्पुटरमध्ये उतरतात, सध्या व्हायरस इंटरनेटवरूनच लोकांच्या कॉम्पुटरमध्ये प्रवेश करतात. आपली यंत्रणा बंद पाडणे, आपली वित्तीय माहिती, इतर खाजगी माहिती चोरणे हे त्यांचे मुख्य काम असते.


कॉम्प्युटर क्षेत्रात व्हायरसची सुरुवात १९७० च्या आसपास झाल्याचं मानलं जातं. त्यावेळी  क्रिपर या नावाचा व्हायरस होऊन गेला . त्यानंतर १९८२ साली एल्क क्लोनर रिचर्ड क्रेंटा या तज्ज्ञाने ऍप्पल या कंपनीच्या कॉम्पुटरसाठी लिहिला. १९८३ साली अशा प्रकारची हानी पोहचवणाऱ्या प्रोग्रॅमला फेडरिक कोहनीन या प्रॉग्रॅमरने व्हायरस हे नाव दिले. टेनेक्स ऑपरेटिंग सिस्टमला बंद पडायचा. त्यांनंतर काही दिवसातच रॉथर जे नावाचा एक बलाढ्य व्हायरस


व्हायरसचे काही प्रकार

१)  वर्म  (Worm)
या मालवेअरचा प्रकार म्हणून ओळखला जातो.  कॉम्प्युटर वर्म एक स्टँडअलोन मालवेअर कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो इतर कॉम्प्युटरमध्ये पसरण्यासाठी स्वत: ची पुनरावृत्ती करतो. बऱ्याचदा, ते स्वत: चा प्रसार करण्यासाठी कॉम्प्युटरचे नेटवर्क वापरतात, अर्थात त्यात प्रवेश करण्यासाठी लक्ष्यकेंद्रित कॉम्प्युटरवर सुरक्षितता अयशस्वीतेवर अवलंबून असतात. याचा जास्तकरून परिणाम कॉम्प्युटर चालू करतेवेळी (OS booting) जाणवतो.

 २) ट्रॉजन हॉर्स ( Trojan Horse)
हा एक धोकादायक सॉफ्टवेअर आहे जो हॅकर्सद्वारे बनवले जाते ज्यामुळे कायदेशीर सॉफ्टवेअरसारखेच कॉम्पुटर वापरकर्त्यांच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळविण्यास भाग पाडतात.  ट्रॉजन हॉर्स हा फसव्या सॉफ्टवेअरचा प्रकार असून आपल्या कॉम्प्युटरवरील माहिती चोरण्याचा हॅकरचा या मागचा हेतू असतो. कॉम्पुटर वापरकर्त्यांना विशेषत: काही आकर्षक सोशल मीडियाद्वारे फसविले जाते किंबहुना जे नंतर दुर्भावनापूर्ण काही वेबसाइटवरूनही डाऊनलोड होतात ज्यामुळे ट्रोजन त्यांच्या सिस्टमवर लोड होऊन आणि ते स्वतःला आपोआप अंमलात आणतात आणि त्यामुळे सिस्टीमला धोका होतो.


३) बॅकडोअर (Backdoor )
हा एक मालवेअरचा प्रकार आहे. हा दुरून एखाद्या सर्वरचा, कॉम्प्युटरचा ताबा मिळण्यासाठीचा  हॅकरचा उद्देश असतो. अर्थात हॅकर ह्याचा उपयोग युझर आयडी, पासवर्ड चोरण्यासाठी करतात. हा  व्हायरस ओळखणे सहसा कठीण काम असते.

 ४) स्पायवेअर (Spyware)
हा एक घातक सॉफ्टवेअरचा प्रकार आहे. हे सॉफ्टवेअर न कळत आपल्या कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करते आणि आपण करत असलेल्या सर्व क्रियावर ते लक्ष्य ठेवूंन हॅकरला माहिती पुरवते.

 ५) रुटकीट  (Rootkit )
रूटकिटला कॉम्प्युटरच्या आत लपविलेल्या दुर्भावनायुक्त संगणक सॉफ्टवेअरच्या रूपात परिभाषित केले जाते आणि मुख्यतः  पासवर्ड चोरण्यासाठी ते कार्यक्षमही राहते. हाच या घातक सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश असतो.

६) एक्सप्लॉईट (Exploite)
हेही एक माहिती चोरण्यासाठी बनवण्यात आलेले एक फसवे सॉफ्टवेअर आहे.

 ७) की लॉकर (Key Locker)
हा व्हायरस असून आपण दाबत असलेल्या प्रत्येक बटणाची नोंद  हॅकरकडे पाठवण्यासाठी हॅकरकडून  याचा उपयोग होतो

८ ) डायलर (Dialer )
हा मोबाईलमध्ये आढळतो, फसवे कॉल करून आर्थिक व्यवहार करण्यासाठी पाठवण्यासाठी हॅकरकडून  याचा उपयोग होतो.

९ ) हायजॅकर (Hijacker)
ब्राउझरवरून कोणतेही काम करता येवू नये म्हणून याचा वापर केला जातो.

अर्थात आपली माहिती सुरक्षित राहावी म्हणून सर्व कॉम्प्युटर आणि मोबाईलधारकांनी  स्वतःकडे व्हायरस वापराने गरजेचे आहे.