Wednesday, January 30, 2019

जी लिहिली नाही, ती कविता!

काय असते खरं ती?
समजण्यास मी पाहतो कविता

कधी अर्थाने तिच्या, 
कधी स्पर्शाने तिच्या
मग हलकीशी मी जाणतो कविता

कवींना खूप छळते म्हणे ती,
लांबूनच मी ऐकतो कविता

म्हणूनच गड्यांनो,
कधी लिहीत नाही, केवळ
मी जगतो कविता 

- गणेश