Wednesday, December 26, 2018

आडनाव

फिरलो जेव्हा लखलखत्या सोसायटीतून
माझ्या सावळ्या वर्णाचा मज समजला
आज काय प्रभाव आहे..
गोळा करत पैसे निघालो तेव्हा,
त्या सदनिकेचा जेवढा आज भाव आहे...


नाही पुसले कोणी मजला जेव्हा
कशी तुझी माणुसकी अन कसा तुझा रे स्वभाव आहे..esh-
बंद झाले प्रवेशाचे सारे दरवाजे तेव्हा
पुसले मज काय तुझे रे आडनाव आहे ?

गल्लीपासून दिल्लीपर्यंत उभा राहिलेला
उमेद्वार आपल्याच आडनावाचा
जिथे आपला प्रभाग आहे..
प्रभागही माझा, भूखंडही माझा
माहित नाही मज त्याचा किती आज भाव आहे...

पाहिले आजचे वृत्तपत्र, मज कळले तेव्हा
मनुवाद्यांचा काय तो भयान डाव आहे..
खरेदी करणार का कोणी ?
हिंदूचं ढोंग करणाऱ्या वैदिकांनी
काढलेला माझ्या देशाचा आज लिलाव आहे...- गणेश