Saturday, December 8, 2018

महागाई कधी नव्हती ?

तू दहा लाखाची कार घेतली तेव्हा
महागाई नव्हती
अन घेतला पन्नास लाखाचा फ्लॅट तेव्हा
महगाई नव्हती
वाह रे पांढरपेशा...

तरीही तुला पाहिजे सातवा
अन आठवा वेतनवाढ आयोग
अन तूला पाहिजे
सर्व सुखांचा उपभोग...
वाह रे पांढरपेशा...

शेतकऱ्याला मात्र आंदोलन करावे
लागते हमीभावासाठी...
तूला मात्र पाच रुपयेची
दोन रुपयांना हवी असते
कोथिंबीरीची पेंडी...
तेव्हाच तुला महागाई दिसती..
वाह रे पांढरपेशा...

शेतकऱ्याला असतो
कधी पूर तर कधी दुष्काळ...
तूला मात्र महिन्याचा
महिन्याला मिळतो रे पगार...
वाह रे पांढरपेशा...

आत्महत्या करतो शेतकरी
अन त्याच्या सांत्वनाच
सोंग करतोस तू ...
भाजीपाल्याच्यासुद्धा
महागाईच्या नावाने बोंब मारतोस तू..
वाह रे पांढरपेशा...

शेतकरी शेतात मर मर मरतो
म्हणूनच तेव्हा रे जगतोस तू...
भुईमूगाला शेंगा वरती येतात की खाली?
यातले काय रे जाणतोस तू...?
वाह रे पांढरपेशा...