Wednesday, December 26, 2018

गाडगेबाबा

दगड मारले अंगावरी जरी
अनंत यातना सहन करत
संघर्ष करनारा
तो खिन्न म्हातारा
मला माहित आहे..

गोपाला गोपाला म्हणत
कीर्तनाने रसिकांना दंग करणारा,
आपल्या आवाजाने जातीभेदाच्या
भिंती लाथाडत प्रबोधन करणारा
अन अंधश्रद्धा निर्मूलनाचा दिवा
आजही तेवत ठेवणारा,
तो म्हातारा मला माहित आहे..

गावागावात कचरा साफ करत
भीक मागून पोट भरणारा,
प्राणिमात्रांचीही सेवा करत
मातीच्या मडक्यात पाणी पिणारा,
तो म्हातारा मला माहित आहे..

गरीब जो, ठिगळांची कापडं घालून
विचारांची श्रीमंती दाखवणारा,
अन माणसात देव शोधणारा ,
तो वयस्कर, पांढऱ्या दाडीचा
म्हातारा मला माहित आहे..


- गणेश