Monday, December 31, 2018

आता नंबर कुणाचा ?

बाणासूर मारिला, हिरण्यकश्पू मारिला,
बळीराजाला पाताळात गाडीला...
आता नंबर कुणाचा ?

ज्योतीबाला दगड मारिले,
सावित्रीवर शेण टाकिले,
डेबुलाही हीन लेखिले,
तुकोबाचे अभंग बुडविले,
आता नंबर कुणाचा ?

गांधी मारिला, दाभोळकर मारिला,
पानसरे, गौरी लंकेश अन
कलबुर्गी संपविला
आता नंबर कुणाचा ?

मीच गौरी, मीच पानसरे, कलबुर्गी
अन दाभोळकर ही ...
असे बरेच जन्मतात आता घरोघरी ...
आता नंबर कुणाचा ?

- गणेश