Saturday, November 10, 2018

माझी आजी

माझी आजी रोज पहाटं उठायची...
मला अभ्यासाला बसवायची...
सकाळी सकाळी माझा डबा
बनवायची,
मला शाळेत धाडायची..

मग सारं आंगण साफ करायची,
शेणानं आंगण  सारवायाची,
मातीच्या भिंती लिपून घ्यायची,
रस्त्याच्या बाजूच्या गटारातला
गाळसुद्धा काढायची...

अंगणातून एखादं जनावर गेलं तर
उखनलेलं पुन्हा सरावायाची,
घरासमोरचा रस्तासुद्धा स्वच्छ ठेवायची..
मग तिचं मन व्कचीतच
कुणालातरी समजायचं..
घर तिला जणू ताजमहाल वाटायचं...
घर, अंगण, गावं, रस्ते कुठंच घाण
तिला आवडत नव्हती..
जणू गाडगेबाबालाच
ती आदर्श मानत व्हती...

एक दिवस आला
गाव पालिकेत गेलं,
गावात काँक्रीटचे रस्ते झाले,
रस्त्यावर लखलखते दिवे आले,
पालिकेतूनच स्वच्छतेची
हवा वाहू लागली ...
तेव्हा मात्र आराम करायला
आजी माझी उरली नव्हती..
कारण दोन आठवड्यापूर्वीच
ती स्मशानी पोहचली होती..

आज तीन वर्ष झाली,
गाव सारा स्वच्छतेने
लखलखत आहे..
माझ्या आजीच्या दारात मात्र
उंबराच्या झाडाचा पालापोचाळा घुटमळत आहे...

- गणेश.