Thursday, July 12, 2018

असहिष्णुतेच्या डबऱ्यात

ढवळतो समाज असहिष्णुतेच्या
डबऱ्यात,
मग उजवावाद गाडू पाहतो
डाव्यावादाला,
वादा-वादी पेटवते मिडियाला सारी...
अन मिडिया पेटवते
पुन्हा वादा-वादी सारी...
अन खजिना मिळतो
पाहणाऱ्या नी वाचणाऱ्या डोळ्यांना,
ऐकणाऱ्या कानांना,
अन लिहिणाऱ्या हातांना...
अन मिळतं छापणार्यांना लिहिणं..
अन मिळतं वाचणाऱ्याला
त्यांच छापलेलं...
जुमल्याच्या साम्राज्यात जसं
भुकेल्यासाठी आपला
घासभर भात देतं व्हावं तसं
लिहिणार्यांसाठी छापतं..
कोण छापते माझे
म्हणून लिहीतो..
कोण समाज पेटला म्हणून...
अन कोण आपले वाचतो म्हणून..
तर कोण आपली खाजवतो म्हणून...
तर कोण जे मी जगलो त्याचा
विद्रोह स्मरावा पिढ्यानपिढ्या म्हणून...
जसे कोणी विक्राळ सत्याला मांडणारे
आम्हा आज स्मरती
तुकाराम नी कबीर म्हणून..


- गणेश.