Tuesday, May 29, 2018

डिजिटल इंडिया आणि भारतीयांसमोरील आव्हाने

       परवा ईपीएफची सरकारी वेबसाईट हॅक झाल्याची बातमी ऐकली, परंतु नंतर श्रम मंत्रालयाने घोषित केले कि काही तांत्रिक कारणास्तव ती बंद केली होती. क्षणभर डोक्यात विचार आला, खरच असे झाले तर काय होईल? सध्याचे सरकार सत्तेवर येताच एका वर्षातच एकावर एक सरकारी योजनांचा पाऊस पडला, त्यातीलच एक महत्वपूर्ण असणारी योजना म्हणजे 'डिजिटल इंडिया' . या योजनेअंतर्गतच  सरकार नागरिकांना तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहित करत आहे. ज्या सरकारी कामांसाठी दिवसेंदिवस वाट पहावी लागत असे, ती कामे आता पटापट होतात. जास्तकरून आर्थिक व्यवहारावर भर देत आहे. परंतु याला तितकेच अडथळेही आहेत, ते आज आपण अनुभवत आहोत. जसे कि तंत्रज्ञान निरक्षरता, २०१७ मध्ये झालेला रॅनसमवेयर व्हायरसचा हल्ला, फेसबुककडून लीक झालेला डेटा, काही दिवसापूर्वी युजर्सना ट्विटरने केलेले पासवर्ड बदलण्याचे निवेदन. पूर्वी युद्धांमध्ये एखाद्या शत्रुराष्ट्रावर हल्ला करण्यासाठी शत्रअस्त्रांचा, रासायनिक अस्त्रांचा म्हणजेच एखादा विषारी वायू, एखादे रसायन यांचा वापर होत असे किंबहुना काही जीवाणू, रोगाटलेले जनावर, माकड, उंदरे, कुत्रे इतकेच नव्हे तर आजारी मानवी मृतदेहसुद्धाचा हल्ला शत्रुराष्ट्रावर करायचा. असे हल्ले दुसऱ्या महायुद्धात भरपूर झालेत. सध्या रासायनिक शत्रअस्त्रांचा वापर करणाऱ्या इसिससारख्या महाभयंकर दहशतवादी संघटना आता इंजिनीअर, हॅकर्सची भरती करत आहेत. ही संघटना स्वतःची सायबर आर्मीही बनवत असल्याची बातमी पुढे आली आहे. ही खरच जगाला चिंतेत टाकणारी गोष्ट आहे. अर्थात प्रत्येक राष्ट्राला आव्हान असणार आहे ते सायबर हल्ल्याचे. असा हल्ला कोणत्याही ठिकाणी बसून कोणत्याही देशावर करता येवू शकतो. याची शंभर टक्के हमी देणारा एक हल्ला गेल्या वर्षी झाला होता. हा हल्ला होता 'रॅनसमवेयर व्हायरस'चा. तुमच्या कॉम्पुटरमध्ये घुसून संपूर्ण फाइल्सवर ताबा मिळवायचा आणि तुमच्याकडून खंडणीची मागणी करायची. असे या हल्ल्याचे उद्दिष्ट होते. 'वॉनाक्राय' नावाच्या रॅनसमवेयरने अनेक देशामध्ये सर्वरवर ताबा मिळवला होता. याचा प्रभाव भारतात जास्त काही जाणवला नाही. परंतु रसिया, जर्मनी, फ्रांस यांसारख्या देशामध्ये याचा परिणाम जाणवला. तिथल्या रेल्वे प्रशासनावर, बँकांवर, वाहतूक व्यवस्थेवर आणि अन्य सरकारी प्रक्रियेवर याचा परिणाम जास्त पडला होता. रॅनसमवेयर हे नुकतेच अनुभवता आलेले उदाहरण आहे. एक्सकोड घोस्ट, युमी, मोबिसेज असे हल्ले सातत्याने कॉम्पुटर - इंटरनेट विश्वात होत असतात. काही मालवेअर्स इतके घातक असतात कि ते तुमचा महत्वाचा डेटा, पासवर्ड चोरू शकतात, करप्ट करू शकतात. काही व्हायरस तर तुम्ही दाबत असणारे प्रत्येक बटन ते ओळखतात आणि तुमच्या आर्थिक व्यवहाराचे प्रत्येक पासवर्ड त्यांना कळतात. 

       आज खेडोपाड्यात कॉम्पुटर पोहचला आहे. मोबाईल, इंटरनेट पोहचले आहे. मुले डिजिटल साक्षर करण्यासाठी, भारतीय सरकार शाळांना, महाविद्यालयांना, पालकांना प्रेरित करीत आहे. नवीन पिढी घडत असताना ती मुलभूत शिक्षणाबरोबर तंत्रज्ञान शिक्षणही घेत आहे, खरे तर सरकारने प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते उघण्यास प्रोत्साहित केले. परंतु त्याबराबारचे व्यवहार कसे सुरक्षित राहतील याकडेही भर द्यायला हवा. सायबर विश्वात धोक्याच्या चाहुली काय असतात याचा पूर्णतः प्रसार आणि प्रचार कमी पडत असताना दिसत आहे. डीएनए आणि नॅशनल सॅम्पल सर्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार ४७ करोड भारतीय इंटरनेट वापरतात परंतु इंटरनेट वापरणाऱ्यापैकी केवळ १२% च भारतीयांना इ-मेल कसा पाठवायचा हे त्यांना माहिती आहे. १४% भारतीयांना टेक्स्ट फाईल कशी बनायची हे माहिती आहे. पूर्णतः भारताचा विचार करता ९१% लोक कॉम्पुटर लिटरसी (संगणक साक्षरता)पासून वंचित आहेत. हे चित्र खरे तर असे आहे कि एखाद्या देशातील शाळा किंवा शाळेत जाणाऱ्यांची संख्या तर खूप आहे परंतु त्या लोकांना आपल नाव कसं लिहितात हे माहिती नाही. ही खरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. याबरोबरच पूर्ण भारतातील खेडोपाड्यांना जोडण्यासाठी मजबूत हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चरचीही गरज भासणार आहे.  
   
        देशात रॅनसमवेयरसारखे हल्ले पुन्हा कधीही होऊ शकतात. याआधीही भारताने असे अनेक हल्ले अनुभवले आहेत जसे की सरकारी वेबसाईट्स हॅक होणे, काही राजकीय पक्षांच्या, विद्यापीठांच्या वेबसाईट्स हॅक होणे, क्रिडीट-डेबिट कार्डचे पासवर्ड चोरीला जाणे इ. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणे म्हणजेच त्या देशाच्या सर्व व्यवस्था ढासळून पाडणे. आणि हे भारतासाठीच नव्हे तर जगासाठी ही तिसऱ्या महायुद्धाची चेतावनीच समजावी लागेल. न कोणी सैनिक, न समोर कोणी शत्रू, न रणभूमी तरीही आक्रमणे होत राहणार. आपण जितके तंत्रज्ञानाकडे वळू आपल्याला तितकेच दक्ष राहावे लागणार आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पायरेटेड सोफ्टवेअर न वापरणे, वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करणे, युजर आय-डी आणि पासवर्ड कधीही कोणाला न सांगणे, फेक इ-मेल्सला बळी न पडणे, आपल्या वैयक्तिक कॉम्पुटरसाठी, मोबाईलसाठी एन्टीव्हायरस वापरणे याच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी सरकारने पहिले सरसावले पाहिजे. हॅकिंगसाठी फेक इ-मेलचा वापर भयंकर वाढला आहे, ओळखीच्या नावाचा वापर करून काही आकर्षक लिंक्स पाठवल्या जातात आणि डमी वेबसाईटवर लॉगीन करायला भाग पाडून युजर आय-डी आणि पासवर्ड चोरले जातात. मोबाईल क्लोनिंग हा एक भयंकर प्रकार पुढे येत आहे, यात तुमचा मोबाईल नंबर क्लोन केला जातो. तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व मेसेज, कॉल हे हॅकर्सकडे वळवले जातात आणि तुम्हाला येणारा बँकेचा ओटीपी किंवा अक्सेस कोड चोरीला जाऊ शकतो. आणि तुम्हाला माहित न पडता तुमच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार होऊ शकतात. सर्व कॉम्पुटरधारकांनी, इंटरनेट धारकांनी याची काळजी घ्यायला हवी. कारण वॉनाक्राय, अर्व्हिलाच, बूटनेट, रॅनसमवेयर अड्व्हायजरी, कोअर बूट,  डोर्कबूट अशा काही हल्ल्यांचा अजूनही धोका आहे. डिजिटल इंडियाकडे जात असताना दिवसेंदिवस कॉम्पुटर आणि प्रोग्राम्मिंगद्वारे चालणाऱ्या यंत्राचा वापर वाढत आहे. असा हल्ला पुन्हा झाला तर काय होईल, कल्पना करा. अन्यथा गुन्हेगारी प्रवृतीचे लोक किंवा त्यापुढे दहशतवादाच्या हाती हे अस्त्र पडले तर कोणकोणत्या देशावर असे हल्ले होतील? शिवाय पाकिस्तानातील दहशतवादी संघटन किंबहुना तिथले सरकारही भारतावर सायबर हल्ल्याची खसखस पिकवूनच असते. इंटरनेट हे सर्व जगाला जोडणारे माध्यम असल्याने, सायबरसाठी संपूर्ण जगाला गृहीत धरून अंतरराष्ट्रीय पातळीवर कडक कायदा करायला हवा. पर्यायाने प्रत्येक देशाने, राज्यानेही आपल्या तपास यंत्रणा आणि आपले सायबर कायदे आणखी कडक केले पाहिजेत. आपल्याला फक्त डिजिटल इंडिया साकारून चालणार नाही, तर सुरक्षित डिजिटल इंडिया साकारावा लागेल. तेव्हा आव्हाने तर मोठी असणार आहेत आणि तयारीसाठी आम्हा भारतीयांकडे आणि सरकारकडे पुरेसा वेळही नाही.

        सरकारने ई-साईन, आधार, फिंगर-प्रिंट पासवर्ड, ई. याच्या सहाय्याने सुरक्षितता मजबूत केली आहे. आपल्याला फक्त डिजिटल इंडिया साकारून चालणार नाही, तर 'सीक्युअर्ड डिजिटल इंडिया' साकारावा लागणार आहे.

Published in Dainik Pudhari (in Bahaar supplement) on 17June 18.

Saturday, May 19, 2018

I turned towards RPA...

        Doing a same work is a very boring job,  when it is time-consuming and tedious work too. As we are aware, change is  constant in life hence I have been very keen in move to Angular or React JS as I had a lot code in dot net so far. While  studying javascript frameworks, I came across something interesting topic that time, I mean, like movie of Will Smith or  RAJANIKANTH. Robot! Automating the processes using Robot. When I was in TechMahindra, have been heard that there was some  training arranged by TechM by the collaboration with UiPath. I thought, It would have been for UI developer. I remember, I  have been ignored RPA that time. Robotic Process Automation (RPA) is one of the emerging trends for the foreseeable  future. In the coming Fourth Industrial Revolution, software robots will automate digital work the same way industrial  robots automated manufacturing and assembly work. Hence, I thought, career prospects look rosy if I do choose this field.

      Basically, There is a great potential with RPA . I can tell you that automating any process mean, delivers direct  profitability while improving accuracy across organizations and industries. The way top-tier companies such as Google and  Aviva embrace this as a way to drive change. This implies 75% of the business processes will be automated in the near  future and many developers would probably transition to automation developers to keep up with the evolving technology.

       According to my observations, most RPA tools are based on .Net Framework because they are more stable, so learning  .Net framework is a good tool for your future. Mind you, there are always going to be opportunities in the job market for  .Net developers, I'm not implying here that Java or other tools are not good tools. Learning the MVC architecture comes in  handy for other languages as Angular js but you should be aware of the usefulness of such architecture. For a change (in a  long time), I am seeing a seller’s market in IT, where people with RPA skills have option to choose from multiple  opportunities and get into employment or enhance their profiles. Also, keeping in view of the future scope in this field,  one can easily expect that a major share of employment opportunities in the world is going to be generated in this field.  And also, the pay packages for the experts who are well skilled regarding all the working aspects of this field is  relatively much higher in comparison with the other fields. At last I chosen RPA, going through Automation Anywhere, Blue  Prism training. Now working on Uipath and It was great feeling, when I completed and delivered my first robot!

Sunday, May 13, 2018

आजची शिक्षणपद्धती आणि आपण

नुकत्याच सर्व शाळा-कोलेजेंच्या परीक्षा पार पडल्या. प्रवेश परीक्षेची धांदल उडालेली आहे, विद्यार्थी अडमिशनची चौकशी करायला लागलेत. शिक्षणपद्धतीच नव्हे, तर त्याबरोबर समाजव्यवस्थाही तितकीच चांगली पाहिजे. नाही तर, एखाद्या विचारधारेत आपण स्वतःला एकदा वाहतं केलं कि आपण त्याच प्रवाहाने विचार करत जातो. कधी विरुद्ध बाजूही बरोबर असते हे मान्य करायला आपण तयार होत नाही आणि अशा ओघात आपण काही चुकीचे तर करत नाही न? असा प्रश्न मनाला पडत नाही. मग अशा प्रवाहातून बाहेर पडणायचं तर लांबच राहून जातं आणि आपण आणखी दलदलीत अडकत जातो. एकदा टीव्हीवर नाना पाटेकरांनी ही चिंता व्यक्त केली होती. प्रसंग होता २६/११ चित्रपटाच्या रिलीजचा. निमत्त होतं अजमल कसाबची भूमिका. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याबद्दलची चिंता असतेच कि ते योग्य मार्गाने जावेत. आज इतक्या वर्षानंतरही आपल्या देशातील शिक्षण पद्धती सुधारलेय की ढासळतेय तेच कळायला काही मार्ग उरला नाही. शिक्षणाबरोबरच तयार झालेल्या विद्यार्थ्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेणेही देशासाठी तितकेच महत्वाचे असते. विद्यार्थ्याचे शिक्षण फक्त शाळा-महाविद्यालयांत होत नसून भोवतालच्या व्यवस्थेतुनही होत असते. एकंदरीत मुलांचा कच्चा माल शाळा-महाविद्यालये तयार करत असतात. परंतु, ती शिकतात आणि घडतात खरं तर समाजव्यवस्थेतून, अनुभवातून. पण आपली चूक ही होते कि शिक्षणाच्या तोंडओळखीलाच आपण संपूर्ण शिक्षण समजतो. त्यातूनच परिक्षेच्या यशापयशावर आपण त्यांची बुद्धीमत्ता मोजतो, खरी फसगत होत आली आहे ती येथेच. 
 
आम्ही कोणत्याही क्षेत्रात जागतीक पातळीवर दखल घेतले जाईल असे ज्ञान निर्माण करू न शकण्याचे कारण म्हणजे आम्ही मुळात शिक्षणपद्धतीच्या माध्यमातुनच आमूलाग्र बदल घडवणाऱ्या मनुष्यबळाच्या क्षमता मारून टाकत आलो आहोत. आपली शिक्षणव्यवस्था विध्यार्थ्याची अभिरुची ओळखते का? परीक्षेला पडणारी टक्केवारी म्हणजेच अस्सल गुणवत्ता नाही, हे समजावण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांनी केला आहे. अर्थात आपण विद्यर्थ्यांचे कुतुहल मारतो हे त्यातूनच स्पष्ट होते. आपण त्यांच्या प्रश्नांना वेडगळ समजतो. पण अशाच वेडगळ लोकांनी क्रांत्या घडवल्यात. शिक्षकांची शिकवण्याची पद्धत कशी असते? विद्यार्थ्याची समजून घेण्याची क्षमता किती असते? त्याची अभिरुची कोणत्या विषयात असते? रोजगाराआधी या प्रश्नांची उत्तरे शोधूयात. शिक्षक केवळ दिलेला विषय शिकवत असतो. केवळ जे पुस्तकात आहे तेच रेटायचे आणि आपल्या महाविद्यालयाचे, बरोबरच आपल्या क्लासचे नाव कसे प्रसिद्धीस येईल याचा प्रयत्न करायचा, हेच आजवर आपण पाहिले आहे. अनेक चित्रपटांनी किंवा  पुस्तकांनी शिक्षक आणि पालकांनाच ओरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मुख्यतः विद्यार्थ्याची शिक्षणाबद्दलची आणि परीक्षाबद्दलची भीती मारली पाहिजे. तो शंका विचारायला घाबरला नाही पाहिजे. शिक्षकांनी त्यांचा आत्मविश्वासही वाढवला पाहिजे. खरे तर विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त वेळ प्रात्येक्षिकात म्हणजेच प्रॅक्टिकल करण्यात कसा जाईल, त्यातूनच ते विद्यार्थ्याची आवड कशी ओळखतील आणि आवडीच्या विषयात विद्यार्थ्याची जिज्ञासा या पातळीपर्यंत कशी वाढवता येईल जेणे करून ते विद्यार्थी रुची असलेल्या क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण बदल घडवून आणतील. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन कसे भेटेल, प्रथमतः हे जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांनी शिक्षक बनावे. काही शिक्षक यावर जोर देतात हेही खरे आहे. आता इथे आणखी एक प्रश्न पुढे येतो कि बहुसंख्य विद्यार्थ्यांचा सोप्या विषयाकडे जास्त कल असतो, अर्थात तिथे स्पर्धाही तशी जास्तच असणार, त्यामुळेच स्पर्धेत टिकणेही कठीण असणार. त्यासाठी आवडीने त्या-त्या क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण संशोधन होवून बदल घडवून आणला तर रोजगारचा प्रशही सुटतो. आज जितके संशोधन झाले आहे, त्यात भारतीय संशोधक किती आहेत? अगदीच बोटावर मोजण्याइतके! हीच क्रांती अमेरिकेत पाहिली, तर ती विलक्षण आहे. अमेरिकेची शिक्षण पद्धती नोकऱ्या तयार करते, तर भारताची शिक्षण पद्धती नोकरदार तयार करते. आम्हाला जर विज्ञानवादी बनायचे असेल तर दुसरी-तिसरीलाच छान छान गोष्टी विषयाच्या अभ्यासक्रमातून भक्त-प्रल्हाद आणि नारायणाच्या दैववादी कथा बालपणातच आमच्या मनावर बिंबवल्या जातात, तिथे शिक्षक तर काय करू शकणार. मग देशतर विज्ञानवादी बनणार कसा?
 
वर्तमानात मनुष्याच्या गरजा वाढल्या त्यामुळे संशोधन झाले, त्यामुळे शिक्षणाची क्षेत्रेही वाढली. नवीन तंत्रज्ञान आले. अनेक पर्याय उपलब्ध झाले. हल्ली इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार आहे. आता विद्यार्थी विनाशिक्षकही शिकू शकतो. हा बदल आजच्या शिक्षणव्यवस्थेसाठी मोलाचा आहे. काही दिवसांनी दहावीनंतर शिक्षकाची गरज काय, हाही प्रश्न उद्भवेल? अर्थात शिक्षकाची गरज उरेल ती केवळ मार्गदर्शनासाठी. सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणेच विद्यार्थी भरकटला जाऊ न देण्यासाठी. कारण आपल्यासाठी हेच खरे कोडे आहे. आपल्यापुढे भावी पिढी विज्ञाननिष्ठ होत जागतिक ज्ञानात भर घालू शकेल इतकी सक्षम करणे, बेरोजगारीचा विस्फोट पाहता आपल्याला ताज्या दमाचे नवे लघु ते महाकाय उद्योग उभे करण्याची क्षमता व प्रेरणा असलेले उद्योजक, व्यावसायिकही निर्माण करणे, यासाठी लागणाऱ्या नवनवीन कल्पनांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, शोधक वृत्तीचे विद्यार्थी तयार करणे, हेही शिक्षक आणि शिक्षणव्यवस्थेसमोरील आव्हाने आहेत. शाळा-कॉलेजे केवळ मुलांचा कच्चा माल तयार करण्याचे कारखाने न होता सु-शिक्षित आणि आधुनिक ज्ञानार्थी मुलांचे भांडार बनले पाहिजे. शाळेत व त्यानंतर महाविद्यालयात जाणे असा जणु नियमच लादल्याने बहुदा सगळेच विद्यार्थी जास्त वेळ महाविद्यालयामध्ये घालवतात आणि घोकामपट्टीच्या अभ्यासक्रमाच्या भोव-यात अडकावले जात असतात. त्यांना ९०% हजेरीची सक्तीही असते. यात शोधक वृत्तीचे विद्यार्थी तयार होणं कठीणच असते. कायम जोर हा प्रात्येक्षिकावरच दिला पाहिजे. एखाद्या गायकाला, संगीतकाराला, नृत्याकाला त्याचे यशाचे कारण विचारले असता, तो लहानपणापासून त्याची कला शिकत असल्याचे उत्तर देतो. त्या कलेत त्याला तेव्हापासूनच रुची असते, आता इथे विरोधाभास हा आहे कि ज्यांना डॉक्टर बनायचे असते त्यांना सक्तीने इतिहासही शिकवला जातो आणि त्याला शिकावाही लागतो, त्यासाठी वेळ तर जातो आणि त्याचा तणाव तो वेगळाच! हीच आमची शोकांतिका आहे, अशासाठी बदल घडून यायले हवेत आणि या अशा शिक्षणव्यवस्थेत होणाऱ्या छोट्या छोट्या बदलातूनच उद्याचा भारत घडतानाचे चित्र दिसेल.
 
शिक्षण सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी शाहू, फुले, आंबेडकर, भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांनी संघर्ष केला खरा, परंतु तीच शिक्षणपद्धती आपल्याला व्यवस्थित बांधता येवू शकत नसेल दोष तो कुणाला द्यायचा? सरकारे येतात - सरकारे जातात पण सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय मात्र खुला होत नाही. त्यामुळे बरेच शिक्षण वाया जात असते. हल्ली अनेक सरकारी उपक्रमही चालू झाले आहेत. स्किल इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा अनेक मोहिमा सध्या सरकार राबवत आहे. परंतु त्या ग्रामीण विद्यार्थ्यापर्यंत अजून तरी  पूर्णतः पोहचलेल्या दिसत नाहीत. यातून पुढे येणारे फायदे ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे, जसे स्किल डेवलपमेंट पॉलिसी, स्किल लोन योजना, स्किल डेवलपमेंट प्रोग्राम. आज महासत्ता होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी धडपडणाऱ्या भारताची ही वाटचाल मुख्यत्वे शैक्षणिक क्षेत्रातील भक्कम पायांवरच आधारित आहे.

Published in Saptahik Chaprak, Pune. 14 May-20 May 2018.
And Dainik Surajya, Solapur. 16 May 2018.

Saturday, May 5, 2018

एक श्रीमंत माय...

       दिवस मावळतीकड झुकला होता, चहाचा कप घेऊन मी गच्चीवर गेलो, वरती पोहचताच एक मोठा श्वास घेत सगळीकड नजर फिरली. एका बाजूला विठ्ठल साखर कारखान्याची चिमणी बकाबका धूर सोडत होती, सरकारांच्या पडीक रानातल्या लहान-मोठ्या बाभळीन्नी तोंड वर काढली होती, सूर्य त्यामाग दडण्याचा जणू अट्टहास करत होता, गावाकडच्या बाजूला विठ्ठल मंदिराच्या कळसाची अस्पष्ट ओळख दिसत होती, त्याबरोबरच भजनाच्या टाळ- मृदूंगाचाही आवाज कानी पडत होता. आमच्या रानाकड नजर फिरली, ऊसाने नुकताच तुरा टाकलेला दिसत होता. नदीकडच्या बाजूनं बगळ्याचे थवे परतताना दिसले.  शेवटी लालसर झालेल्या आभाळावर नजर स्थिरावली, पांढरे, काळे, लाल, निळे अशा वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे आकार दिसत होते, नजर जरा स्थिरावली..,  अडकल्यासारखी झाली.

      "आरे...! जरा माग सरून बस..!" असा एक जवळीकता साधणारा आवाज काणी पडला. क्षणभर वाटले, आईने आवाज दिला असावा अशी त्यातही आपुलकी दडली होती. आभाळाकड पाहिलं, एक निरागस चेहरा माझ्याशी बोलू पाहतोय.. नकळत मी दोन पावलं मागं गेलो, थोडं दचकल्यासारखं झालं.  "तुला माझ्याबद्दल सारखं एक कोडं पडतं कि मला जन्म कोणी दिला ? मी अजून किती मोठा आहे ? मी हे विश्व व्यापले आहे कि विश्वाने मला व्यापले आहे? मला आकार-उकार कोणी दिला? " आणि त्याला जणू या सर्व गुढाचं विश्लेषण करायचं होत, परंतु त्याने ते हसून टाळलं. तो का हसतोय असा विचार करेपर्यंत त्याने पुढे बोलायला सुरवात केली.  "प्रत्येकजण मझ्याकड वेगळ्या भावनेने बघतोय, गड्या..., तू जर उद्या प्रियकर झाला, तर चांदणी चंद्रासोबत काय अल्लड चेष्टा करत बाजूला जणू नृत्य करत असते, हे  तूही पाहशील जसे कि आज तू असे बहुत प्रश्न डोक्यात धरून पाहतोय! कोण मला दूरदर्शी भिंगातून बघून सिद्धतांचे उलगडे करण्यात रमला आहे तर... तर कुणी रानांत डुलणारं पिक पाहून जरा आनंदाने न्हाहत आहे, कुण्या भागात माझ्यामुळं डोळ्यात अश्रूही आहेत." येवढ ऐकताच क्षणातच त्यानं रंग बदलला लालसरचा जरासा काळसर झाला.

       "कदाचित माझ्यामुळही महाराष्ट्राचे दोन तुकडे होण्याची वेळ आली आहे, असं काहीस मलाही वाटतं, माझं अन मान्सूनच तिकडं काही पटलच नाही बघ, माझ्या हातात तर काही नाही, गड्या! मला सूर्यकिरण, समुद्र  अन वाऱ्यान साथ दिली, तर पाहिजे खरं! जेव्हा विदर्भातला शेतकरी डोळ्यावर हात धरून वरती पाहत असतो,  तेव्हा मदतीसाठी पुढं जाणारे माझे हात कुणीतरी धरून ठेवतंय असं वाटतं, याचमूळ आज आत्महत्येची वेळ आलीय यात मला दोषी धरलं जातं. माझ्याकडं इंद्रधनुष्याच्या निम्मित्तान पाहणारे लोक इंद्रधनुष्याच्या वेगवेगळ्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या विचाराचे आहेत रे!" त्याचा कंठ दाटून आला होता, काळसर झालेल्या चेहऱ्याकडं पाहून आता पाऊसाला सुरुवात होईल असं वाटलं. जरा वेळ त्याने डोळे मिटले आणि माझ्या कपाळावर पाण्याचे दोन थेंब पडले.  आपल्याला तळमळीनं सांगणारा व्यक्ती आपल्या जवळचाच असतो, असा विचार माझ्या मनात खेळतो तोच त्याने पुढे बोलायला सुरुवात केली  "रात्रीच्या वेळी चिमुकली मंडळी जेव्हा चांदोमामा, चांदोमामा भागलास का ? म्हणून गात असतात त्यांच्याकड पाहून मलाही वाटत, कि ते गोंडस बालपण मलाही अनुभवता यावं, माझ्याही चेहऱ्यावर तो बालिश आनंद असावा, पण जेव्हा रात्रीच्या वेळी अनाथ मंडळी चांदण्यामध्ये आपले आई-बाबा शोधतात तेव्हा  मला आठवते ती आगळीवेगळी माय.. सिंधुमाई... धन्य ती माऊली, धन्य तिचं कार्य. जेव्हा ती माऊली बोलत असते, केवळ ऐकत रहावसं वाटतं. भारताची संस्कृती मूळतः स्त्रीप्रधानच होती. नंतर वैदिक परंपरामुळे स्त्रीला कायमच दुय्यम स्थान दिलं गेलं. आणि त्यामुळेच अशा उद्रेकातून अशा क्रांतिकारी स्त्रिया जन्म घेत गेल्या. पुरुषप्रधान संस्कृतीने या माउलीला कायमच एक चिंधी म्हणून हिणवलं. चिंधीचे अल्पवयात लग्न झालं. या चिंधीची ही माऊली सौ. चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते केवळ अकरा वर्ष आणि नव-याचे वय तीस वर्ष. घरी खूप सासुरवास आणि मेहनतही करावी लागत असे. खूप यातना भोगल्या आहेत त्या माऊलीने."
हे सर्व सांगताना तो आपल्याच आईबद्द्ल सांगत होता, असे काहीसे भासत होते.

         मी मन लावून ऐकत होतो. त्याने तसेच पुढे बोलणे चालू ठेवले. "अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील खूप मोठा संघर्ष केला. तेव्हा गुरं  राखणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुरं ही शेकडो असायची त्यांचे शेण-घाण काढता काढता कंबरठे मोडायचे. लेकुरवाळ्या स्त्रीसाठी मोठे कष्टाचे काम. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्यासाठी माईना कसलीही मजुरी मिळत नसे, म्हणून माईंनी बंड पुकारला. माई हा लढाई जिंकल्या पण या लढ्याची किंमत त्यांना मोजावी लागली. बाईच्या या धाडसामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण त्याला जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली होती आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले होते. याचा काटा काढण्यासाठी, माईच्या पोटातील मूल आपलच असल्याचा खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला. यामुळे माईंचे पती श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले कारण माईंना गोठ्यातल्या गाईनी तुडवून मारावे. त्या अवस्थेत त्यांना मुलगी जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना गावातूनही हाकलून दिले. माराने जखमी झालेल्या माई माहेरी आल्या पण त्यांच्या सख्या आईनेही पाठ फिरवली."

         "पोट भरण्यासाठी भिक मागणे हा एकमात्र पर्याय उरला. परभणी-नांदेड-मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. कारण त्यांना स्मशानच सर्वात सुरक्षित वाटत असत कारण भुताच्या भीतीने तिथं कुणी येत नसे. ती माय जनावरात वाचली आणि भूतात राहिली असे म्हणायला हरकत नाही. पण पोटातल्या भुकेच काय? भूक तर रोजच लागते. असाच एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघून गेले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितेवरच्या निखा-यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली. असाच एक दिवस. एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते."
बोलता बोलता तो मध्येच जरा शांत बसायचा. त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. मी त्याच्या चेहऱ्याकडंच बघत ऐकत होतो.

    "आपण जे जगलो ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती, कारण आई ही शेवटी आई असते. निराश्रीतांच्या कल्याणासाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले कारण एका आईकडून स्वतःची मुलं आणि दान घेतलेली मुलं यात फरक होऊ नये. आणि ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केल असते ? ज्या मुलांना माई सांभाळणार होते ती मुलं पाणी पिऊन झोपली असती , पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेट गणपतीच्या पायाशी घातले. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पसाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनसाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवाशी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. आजही अशा अनेक लढाया माई रोज लढतच असतात."


     आता त्याला शब्द फुटत नव्हता, कंठ दाटून आला होता. तरीही तो पुढे बोलू लागला. "आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच अनाथ मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. मोठ्या होत आहेत.  दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत हजारो त्यांची मुले आहेत. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचा नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही एम.एस.डब्लू. केले आहे. ती आता माईचे काम पाहते. माईना आजवर १७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे. त्या म्हणतात पुरस्काराने पोट नाही भरत, माझा संघर्ष जगण्याशी आहे. जणू मीही सुरेश भट, बहिणाबाई, विं. दा., सावित्रीबाई फुले यांचच जीवन जगत आहे.  माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. कारण मी पाहिलेल्या माईंमध्ये हीच सर्वात श्रीमंत माय होती, कारण ही अनाथांची माय होती." हे शब्द पूर्ण होता न होताच आकाशातून पाउसाला सुरुवात झाली , गडगडाट झाला, जणू त्याने एक हुंदका देऊन डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून  दिली. तोच खालून आवाज आला, "गणू, वैरण गोठ्यात टाक अन गाई आत बांध...!"  गाई गोठ्यात बांधायला मी धावणार तोच हातातला चहा पाहीला, तो कधी थंड झाला याचे भानही राहिले नव्हते, मी जीना उतरून हंबरडा फोडणाऱ्या वासराकडे धाव घेतली ज्याची आई काही दिवसापूर्वीच त्याला सोडून गेली होती.

Published as 'Sindhumaaichee Naarishakti' in Saptahik Pandhari Vaarta (17 October 2018) on the occasion of Navratri.

Published in Masik Adhunik Sarthi, Solapur. on the occasion of International Women's day (8 March 2018)

Robotics Automation


           Now a day, we are experiencing, the technology is making a big revolution in daily leaving life. We can see concepts like screen touch, and Automated teller machine (ATM), high speed internet, Social media, etc. are getting utilized in today's running life. We are well aware with the growing up history of science, since the invention of wheels for the vehicle by the primordial human till the discovery of airplane by Wright Brothers and since the invention of electric light bulb by Edison till discovery of telephone by Graham bell. These people were inventors as well as businessmen. Isaac Asimov had introduced set of some laws for Robotics in his 1942 short book ‘Runaround’ after some an amendment robot’s design and behavior ruled like human being.

         Now Most of the organizations are using 'Robots' to save man power, money, time as we have been seen these concepts in movies. According to the group of some scientists, Robot concept is since long back around 400 years but use of robots has been increased in 20th century and now for career perspective Robotics Process Automation (RPA) is very emerging field. The faster you harvest their potential, the faster you create a competitive edge for your business. Robotic Process Automation delivers direct profitability while improving accuracy across organizations and industries, that’s the reason most of the multinational companies showcasing their approach towards implementation of RPA. I can tell you that RPA has great potential, once you standardize any process, Robot can be designed to perform on a vast range of repetitive tasks, and software robots interpret, trigger responses and communicate with other systems just like humans do. Processes like face recognition, voice recognition, image recognition, etc. come under Artificial Intelligence. We can see those Apple Inc. has implemented robot named as Siri in iPhone, OK Google by Android. which obey the command given by user. Also password of user’s face can be set to iPhone. ‘Machine learning’ is also one of the branches of RPA. Which deals with semantic based information retrieval systems like search engines. Information can be in form of images, video, text etc. These kinds of robots works on rule based repository. Cognitive robotics is also a field of technology involving robots that can learn from experience, from human teachers, and even on their own, thereby developing the ability to effectively deal with their environment. Cognitive robotics is the extension of Artificial intelligence.

           Most of the multinational companies are putting more focus on process automation like data entry, content conversion, data manipulation, KPO and BPO process, etc. After enabling Robotics Process Automation, to automate any processes will not only transform and streamline your organization’s work-flow but it will allow for superior efficient, scalability and flexibility within the enterprise region, doubled by fast, tailored response to specific needs. Robots are easy to train and they integrate seamlessly into any kind of system. Multiply them, and instantly deploy more as you go. 
            If we think about career perspective, we can have better a great future in RPA. We have seen that most of the technologies been got outdated because of some new technology came up into the market. But In the coming Fourth Industrial Revolution, software robots will automate digital work the same way industrial robots automated manufacturing and assembly work. Hence, career prospects look rosy if you do choose this field. Also, keeping in view of the future scope in this field, one can easily expect that a major share of employment opportunities in the world is going to be generated in this field. And also, the pay packages for the experts who are well skilled regarding all the working aspects of this field is relatively much higher in comparison with the other fields. Training for RPA is available in private institutes in Bangalore, Hyderabad, Chennai, Pune and Mumbai. Also training of development tools for is available on internet, To make avail of these exceptionally high ranging career opportunities provided by the field of RPA, the major prominent thing for anyone to do is to leverage their knowledge regarding all the in-depth aspects of Robotics Automation. Actually schools can have to add small robotics programs on process automation to their after school curriculum. Robotics competitions also include aspects of growing business. Government, schools, colleges should increase number of program for children to learn and get excited about robotics at a young age. I can tell you that RPA will have vital role in making the ‘Digital India.’

Published in Sakal Times, Pune. on 7 May 2018.

चला रोबोटिक्सच्या दुनियेत...

       आजवर विज्ञानाने लावलेले शोध आणि त्यामुळे सोयीस्कर झालेले मानवी जीवन आपणाला माहिती आहेच आणि आपण ते उपभोगतही आहोत. अगदी आदिमानवाच्या चाकाच्या शोधापासून ते राईटबंधूच्या विमानाच्या शोधापर्यंत! आणि एडिसनच्या दिव्यापासून ते आजच्या ग्राहम बेलच्या फोनपर्यंत! आदिमानव ते आधुनिक मानव या प्रवासात अनेक संशोधन होत गेले. मानव वेगवेगळ्या ग्रहावरही जावून आला. अशा अजूनही अनेक कल्पना पुढे येत राहतील आणि विज्ञानाच्या जोरावर मनुष्य प्रगती करत राहील. 'रोबॉट' ही त्यातलीच आणखी एक अभिकल्पना! जगात अभियांत्रिकीकरणाने प्रचंड वेग घेतला आहे. आपले दैनंदिन जीवन सोपे व्हावे, वेळ, पैसा वाचला जावा यासाठी अभियांत्रिकीकरणात मानवाने टाकलेले आणखी एक पाउल! 'रोबॉटिक्स' मध्ये इलेक्ट्रॉनिक्स (Electronics Engineering), यान्त्रिकी (Mechanical Engineering) आणि कॉम्पुटर सॉफ्टवेयरचा ( Computer Engineering ) समावेश होतो.

        विज्ञानात पहिल्यांदा रोबॉटिक्स शब्दाचा वापर आइसेक एसिमोवने १९४२ मध्ये  त्याच्या 'रनअराउण्ड' या पुस्तकात केला होता. आज काही विचारवंत असेही दावे करतात कि रोबॉटिक्स ही संकल्पना ४०० वर्षापासून आहे. असेलही ! परंतु २०व्या शतकात रोबॉटचा वापर वाढत गेला आणि आजपर्यंत वाढत आहे . आर्टीफीशीअल इंटीलीजंस (Artificial Intelligence), मशीन लर्निंग (Machine Learning), कोग्नीटीव (Cognitive ), प्रोसेस ऍटोमेशन (Process Automation) अशा रोबोटिक्सच्या शाखा पडतात. सध्या आपल्याला कारखान्यात, मोठ्या कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये अशा अनेक मशीन काम करत असताना दिसतील कि ज्या संगणक प्रणाली (सोफ्टवेअर), सेन्सर, इलेक्ट्रॉनिक्स चिप्सचा वापर करून मनुष्याचे काम करतात. कामाप्रमाणे रोबॉटचे प्रकार पडतात. मनुष्य जशी व्यक्ती ओळखून त्यासंबंधीची कामे करतो, जसे कि फेस रेकग्निशन, व्हॉइस रेकग्निशन, इमेज रेकग्निशन हे प्रकार आर्टीफीशीअल इंटीलीजंसमध्ये मोडतात. गूगल वर काही सर्च केले असता, आपल्याकडून काही चुकले असेल, तर गूगलने सुचवलेले बरोबर सर्च पर्याय येतात, म्हणजेच हा एक मशीन लर्निंग चा रोबोट आहे. उदा. आपण 'Wife' किंवा 'Spouse' या शब्दाबद्दल काही सर्च करत असाल दोन्हीचे रिझल्ट सारखेच असतील. तर कॉग्निटिव्हमध्ये आर्टीफीशीअल इंटीलीजंसच्या साहाय्याने मानव निर्मित डेटा रिपोर्ट्स बनवणे अशी कामे येतात, जसे की मनुष्याने आवाज देऊन मशिनकडून काम करून घेणे. उदा. आपण 'WIRED' या शब्दाबद्दल काही शोधत असेल आणि चुकून 'Wored' शब्द टाईप झाला असल्यास रोबोट काही क्षणात 'WIRED' हा शब्द घेतो आणि त्या संबंधित रिझल्ट मिळतात. तर प्रोसेस ऍटोमेशनमध्ये रोबोटकडून डेटा एंट्री करून घेणे, डेटा स्कॅन करून घेणे, पर्यायी उत्तरे असणारे पेपर तपासणे इ. कामे येतात. मनुष्याची कामे आणि विचार मशीनला करायला लावणे हे अगदी मजेशीर असल्याने, या क्षेत्रात अनेक गंमती अनुभुवयाला मिळतात, बरेच काही शिकायला मिळत राहते. आजच्या युगाला रोबोटिक्सची मागणी असल्याने मार्केट स्टॅंडर्ड पॅकेजेसही आहेत.

         आज जर विचार केला, तर १० वर्षांपूर्वी फेसबुक हे नाव फारसं प्रसिद्ध नव्हतं. व्हॉट्स अ‍ॅप या शब्दाचा जन्म व्हायचा होता. आणि टच स्क्रीन काय असतं हे बहुतेकांच्या कल्पनेतही नव्हतं. परंतु आज तंत्रज्ञान क्रांती करत आहे. सगळे काही ऑटोमेशनमध्ये होत आहे.  आज ज्या नोकऱ्या आपण बघत आहोत अशा नोकऱ्या राहणार नाहीत अर्थात त्याच स्वरूप बदलेले असेल. रोबोटिक्समुळे मनुष्यबळ, वेळ, पैसा वाचला जात आहे. बदलणाऱ्या विश्वाप्रमाणे नवीन तंत्रज्ञान शिकत गेले पाहिजे, बहुराष्ट्रीय कपंन्यांमध्येही रोबोटिक्स इंजिनिअरची मागणी वाढत आहे.  भविष्याचा विचार करता नोकरीसाठी ही एक चांगली संधी आहे. याचे ट्रेंनिंग पुणे, हैद्राबाद, बंगळूरू अशा शहरांमध्ये खाजगी इन्स्टिटयूड मध्ये उपलब्ध आहे. इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये, खाजगी संस्थांमध्ये, सरकारी संस्थांमध्ये असे अनेक रोबोट वापरले जाऊ लागले आहेत. अर्थात 'डिजिटल इंडिया' साकार होण्यासाठी या क्षेत्राला नक्कीच आणखी मागणी असेल.Published in Dainik Sakal, Pune 21 March 2018.
Published in Dainik Surajya, Solapur 8 Feb 2018.