Monday, January 28, 2013

राजकारण...


               देशाच्या घटनेला आज ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने  संविधाननुसार कारभार चालवत आपल्या लोकशाहीचा आदर्श जगापुढे ठेवला आहे. भारतीय समाज व्यवस्थेत  व्यक्ती-स्वातंत्र्य,  अर्थकारण, समाजकारण याबरोबर राजकारण हा देखील महत्वाचा घटक आहे. 

                आज-काल राजकारणाकडे बघण्याचा लोक्कांचा दृष्टीकोन कसा आहे, सांगावे लागत नाही. नुकत्याच पार पडलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनात तर सर्व भारतीय राजकारणाविषयी द्वेषाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकारण वाईटच असा एल्गार अण्णांनी अनेकवेळा दिला. केजरीवाल यांनी राजकारणाचा योग्य पर्याय निवडला. जर सिस्टमला बदलायचे असेल  तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही. 

                 येथे सांगण्यासारखे एवढेच आहे की, राजकारण करण्याचे मुद्दे  समाज सुधारणेचे , देश हिताचे,विकासाचे असावेत. सत्ताधारी आणि विरोधाकामधील टीका करण्याचे शैली द्वेषात्मक नसून समाजाच्या प्रभाविशाली दृष्टीकोनातून असावी. आज-काल मिडीयाने समाजासमोर सर्वच राजकीय नेत्यांची एक अनपेक्षित प्रतिमा ठेवली आहे.  सोशल नेटवर्किंग साईट्सवर सुद्धा नेत्यांबद्दल अतिशय खालच्या  स्तरावर कमेंट्स पडतात. हे चित्र पाहून, अतिशय कीव वाटते. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशाने  प्रत्येक नागरिकाला व्यक्ती- स्वातंत्र्य दिले खरे पण त्याचा उपयोग सु-संयोग पद्धतीने व्हायला हवा.  

    आज काल राजकारणात "याच्यामागे एक घाणेरडे राजकारण आहे?" असे शब्द कानी पडतात. चित्र बदलायचे असेल तर त्यासाठी तरुणांनीच सिस्टममध्ये उतरले पाहिजे. स्व:स्वार्थ बाजूला ठेवून देशहिताचे उद्दिष्ठ नजरेसमोर ठेवले पाहिजे, अशी अंतकारातून तळमळ राजकारणातून देशाला दिसली पाहिजे.  तेव्हा कुठे तरुण वर्गाला देशहित कार्यासाठी व्यासपीठ मिळेल .