Tuesday, January 29, 2013

माझ इवलस गांव


घेतं मन माझं 
पुन्हा तिकडच धांव 
आहे भीमेच्या तीरावर 
माझं इवलस गांव 

गावं माझं जणू देवभोळं 
गाई इठूबाच गाणं
म्हणे इठू माझा देव
माझं जिणं तेचं देणं
आहे भीमेच्या तीरावर 
माझं इवलस गांव 

काय सांगू  रे 
माझ्या गावाची कथा  
माती नेसली इथं 
जणू हिरवा अंगरखा 
गावच्या या मातीत 
पिकत रे सोनं 
आहे भीमेच्या तीरावर 
माझं इवलस गांव 

माझ्या गावाचा गोडवा 
मले आठव आठव 
निखळ मायेचा झरा 
पुन्हा साठव साठव 
माझ्या काळजाचा ठाव 
आहे भीमेच्या तीरावर 
माझं इवलस गांव 

- गणेश.