Monday, January 14, 2013

आज पुन्हा गावाकडची आठवण आली...

पहाटे कधी केव्हा जाग आली,
गारवा घेवूनी धुक्याची लाट आली..
वेदनांना वाहून नेले,
सूर्य नव्याने उगवायला उभारी आली...
गारव्याच्या ऋतूचे बोट पकडुनी,
अंकुरतील तराणे दवबिंदूंना झेली...
जीव पुन्हा पुन्हा कासावीस नको,
ते सर्व थंडीसवे वाहून जाई...
पुन्हा नव्यानं काही उगवून येई...
मला पहाटे कधी केव्हा जाग आली,
आज पुन्हा गावाकडची आठवण आली....!

हरेक सकाळ अशी नवी,
फांद्यांना छेडणाऱ्या किरणातुनी,
पक्षीही घेवून गेले भरारी...
सूर-पारब्यांच्या झाडावर चढुनी,
दिस असे गेले किती सरुनी...
आज का डोळे झाले चिंब अश्रूंनी,
का कोणास ठावूक एकाकी...
मला पहाटे कधी केव्हा जाग आली, 
आज पुन्हा गावाकडची आठवण आली....!
                                                                         - गणेश.