Monday, March 11, 2013

आजची शिक्षणपद्धती...

              कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या पत्नीने त्यासाठी हातभार  दिला. इथपर्यंत की, वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी त्यांनी आपले मंगळसूत्रही गहाण ठेवले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचेही शिक्षण क्षेत्रातले योगदान खूप मोठे आहे. खरचं, थोर ते महात्मे आणि थोर त्यांचे समाजकारण!

            आजच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याबाबत नेहमीच आवाज उठत राहिला आहे, कारण   विद्यार्थ्यांच्या अभिरुची ओळखून शिक्षण  असावे. हे अनेकवेळा संगभूमीने समाजासमोर मांडले आहे.देश आणि राज्यात शिक्षणाचे धोरण ठरवणा-या राज्यकर्त्यांना याचा कधीच विचार का करावा वाटला नाही. माझ्या मते आपली शिक्षण पद्धती ही क्षमतेने मिळणा-या संधींना अडथळे निर्माण करणारी आहे. उदा. "सुंदर गाता तुम्ही पण पदवीधर आहात का ? त्याशिवाय तुम्हाला ही संधी आम्ही देवू शकत नाही". किंवा " आवाज अत्यंत वाईट आहे, गाणे सुद्धा बेसूर आहे,पण म्युझिक मध्ये डॉक्टरेट आहे,यांना संधी देवू या आपण ." 

            मुळात आपली शिक्षण पद्धतीच सदोष आहे यावर आंदोलन का होत नाही? मार्क म्हणजे गुणवत्ता हे कोणी सांगितले? प्रतिभा, उद्यमशीलता आणि निर्माणक्षमता यांचा मार्कांशी काहीएक संबंध नाही हे आपण अगदी आईन्स्टाईनपासुन पाहु शकतो. आपली शिक्षण पद्धती ही क्षमतेने मिळणा-या संधींना अडथळे निर्माण करणारी आहे.

              अजून एक नमूद करण्यासारखी बाब म्हणजे शिक्षणाचे खाजगीकरण खूपच फोफावले आहे. आज शिक्षण हे गरिबांसाठी उरले नाही त्याला आजची राजकीय मानसिकता जबाबदार आहे, आजच्या राजकारण्यांच्या वडिलांनी, आजोबांनी शिक्षण चळवळी केल्या, त्यावर यांचा आजचा बिझिनेस चालू झाला आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल कोलेजच्या फीज सामान्य माणसाला परवडणाऱ्या नाहीत…. 

Wednesday, February 27, 2013

लोकांचे भय आहे...

स्वार्थाच्या शर्यतीत पैसा फक्त ध्येय आहे ,
नाहीतर, व्यर्थ जीवनाला आज काय अर्थ आहे?

धर्म, प्रांत, जात याचेही दंगलीपर्यंत राजकारण आहे,
नाहीतर, 'भारतीयत्व' आमच्यात आज कुठं उरलं आहे? 

स्त्रीचा आदर केला, एक शिवाजी होऊन गेला, 
पुस्तकातलं मात्र पुस्तकात राहिलं आहे...

मागणं कसं मागावं देवाकडं, मरणानंतर मोक्ष आहे,
नजर मूर्तीवर , मात्र चप्पलावर लक्ष आहे,

झुकावं लागणं देवापुढ, आज माणसाची सवय आहे, 
श्रद्धा कसली? देवाचे नव्हे, लोकांचे भय आहे...


- गणेश.

Thursday, January 31, 2013

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा - महात्मा फुले


कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा | काळ तो असे यवनांचा ||
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा | असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले ||
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले | जिजाबाईस रत्न सापडले ||
हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले | ज्यांनी कमळा लाजविले ||
वर ख़ाली टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले | स्पटिकापरी भासले ||
सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले | नांव शिवाजी शोभले ||
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले | जसा का फणीवर डोले ||
एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले | मोती लडी गुंतविले ||
रक्‍तवर्ण नाजूक होटी हासू छपविले | म्हणोन बोबडे बोल ||
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले | विषादें म्रुग वनी गेले ||
नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले | ज्यांनी चंद्रा हाटविले ||
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले | कुरळे केस मोघीले ||
आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले | चिन्ह गादिचे दिसले ||
जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले | धाकट्या बाळा लेविवले ||
किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले | कलाबतुचे गोंडे शोभले ||
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले | डाग लाळीचे पडलेले ||
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे | पायी घुंगरू खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले | ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||
मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले | चिन्ह पाळणी दिसले ||
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले | पाळण्या हालवू लागले ||
धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले | गातों गीत तिने केले ||

||चाल ||
जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जी गाऊं |
चला वेरूळांस जाऊ, दौलताबादा पाहू ||
मूळ बाबाजींस ध्याऊ, किर्ती आनंदाने गाऊ |
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधराऊ ||
पाटिल होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ |
थोर विठाजी नाव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ |
दिपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ||

|| चाल ||
मालोजी राजा | तुझा बा आजा ||
यवनी काजा | पाळिल्या फौजा ||
लाविल्या ध्वजा | मारिल्या मौजा ||
वेळेस मुक्का | साधल्या बुक्का ||
विचारी पक्का | जाधवा धक्का ||
शेशाप्पा नायका | ठेविचा पैका ||
द्रव्याची गर्दी | चांभारगोंदी ||
देवळे बांधी | तळी ती खांदी ||
आगळी बुध्दी | गुणाने निधि ||
लिहीले विधि | लोकांस बोधी ||
संधान साधी | जसा पारधी ||
भविषी भला | कळले त्याला ||
सांगोनी गेला | गादी बा तुला ||
उपाय नाही जाणोन चाकर झाला यवनाचा | शिपाई होता बाणीचा ||
खोट्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा | पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा || १||

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले | धाकट्यासवे ख़ेळले ||
उभयतांचे एकचित तालमीत गेले | फरीगदग्या शिकले ||
आवडीने खमठोकी कुस्ती पेचाने खेळे | पवित्र दस्तिचे केले ||
द्वादशवर्षी उमर आली नाही मन धाले | घोडी फिरवू लागले ||
अट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शिकले | गोळी निशाण साधले ||
कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावले | पुत्रा नीट ऐकविले ||
अल्पवयांचे असता शिकार करू लागले | माते कौतुक वाटले ||
नित्य पतीचा आठव डोंगर दुखाःचे झाले |घर सक्‍तिने घेतले ||
छाती कोट करून सर्व होते साठविले| मुखमुद्रेने फसविले ||
चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले | पित्यास मनी त्यागिले ||
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडले | हीत उपदेशा योजिले ||
मनी पतिभक्‍ती पुता बागेमधी नेले | वृक्षाछायी बसविले ||
पुर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळिले | नेत्री पाणी टपटपले ||
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले | सांगते मुळी कसे झाले ||
क्षेत्रवासी म्हणोन नाव क्षत्रिय धरले | क्षेत्री सुखी राहीले ||
अन्य देशिंचे दंगेखोर हिमालयी आले | होते लपुन राहीले ||
पाठी शत्रुभौती झाडी किती उपासी मेले | गोमांसा भाजून धाले ||
पाला फळे खात आखेर ताडपत्रा नेसले | झाडी उल्लघून आले ||
लेखणीचा धड शीपाया सेनापती केले | मुख्य ब्रम्हा नेमले ||
बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले | कैदी सर्वास केले ||
सर्व देशी चाल त्याचे गुलाम बनविले | डौलाने क्षुद्र म्हणाले ||
मुख्य राजा झाला ज्याने कायदे केले | त्याचे पुढे भेद केले ||
ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले | उरल्या क्षत्रिया पिडीले ||
माहारमांग झाले किती देशोधडी केले | ब्राम्हण चिरंजीव झाले ||
देश निक्षत्रीय झाल्यामुळे यवना फावले | सर्वास त्याही पिडीले ||
शुद्र म्हणती तुम्हा ह्रुदयी बाण टोचले | आज बोधाया फावले ||
गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले | बोली नही मन धाले ||

||चाल ||
क्षेत्र क्षत्रियांचे घर,तुझे पित्रु महावीर | सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचे माहेर||
शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर | दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर ||
झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर | पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ||
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार | भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीक फार ||
धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियांस मार | दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनी गार ||
लोभी मेले येथे फार, विधवा झाल्या घरोघर | उपाय नाही लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ||
दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर | मार त्याचा अनिवार, केला क्षत्रिया संव्हार ||
क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर | दुःखा नाही त्यांच्या पार, ठाव नाही निराधार ||
बहू केले देशापार, बाकी राही मांगमाहार | निक्षेत्री झाल्यावर, म्लेच्छे केले डोके वर ||
आले सिंधू नदीवर, स्वार्‍या केल्या वारोंवार | गाते काटांवात सार, लक्ष देई अर्थावर ||

||चाल ||
काबुला सोडी | नदांत उडी ||
ठेवितो दाढी | हिंदूस पिडी ||
बामना बोडी | इंद्रिये तोडी ||
पीडिस फोडी | देऊळे पाडी ||
चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||
गौमांसी गोडी | डुकरांसोडी ||
खंड्यास ताडी || जेजुरी गडी ||
भुंग्यास सोडी | खोडीस मोडी ||
मुर्तीस काढी | काबूला धाडी||
झादीस तोडी | लुटली खेडी ||
गडांस वेढी | लावली शिडी ||
हिंदूस झोडी | धर्मास खोडी ||
राज्यास बेडी | कातडी काढी ||
गर्दना मोडी | कैलासा धाडी ||
देऊळे फोडी | बांधीतो माडी ||
उडवी घोडी | कपाळा आढी ||
मीजास बडी | ताजीम खडी ||
बुरखा सोडी || पत्नीस पीडी ||
गायनी गोडी || थैलिते सोडी ||
माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा | बेत मग केला लढण्याचा ||
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा | स्नेह यशाजी कंकाचा ||
मित्रा आधी ठेवी जमाव केला मावळ्याचा | पूर करी हत्यारांचा ||
मोठ्या युक्‍तीने सर केला किल्ला तोरण्याचा | रोविला झेंडा हिदूंचा ||
राजगड नवा बांधिला उंच डोंगराचा | भ्याला मनी विजापूराचा ||
दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा | दादोजी कोंडदेवाचा ||
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा | पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी- भूषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||२||

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात | चाकरी ठेवी लोकांस ||
थाप देऊन घेई चाकण किल्ल्यास | मुख्य केले फिर्डोजीस ||
थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास | कैद पाहा केले मामांस ||
सुप्या सोबत हाती घेतले तीनशे घोड्यास | करामत केली रात्रीस ||
मुसलमानां लांच देई घेई कोडाण्यास | सिंहगड नाव दिले त्यास ||
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास | कैद पाहा केले सर्वांस ||
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस | मारले नाही कोणास ||
वाटेमधी छापा घालून लूटी खजिन्यास | साठवी राजगडांस||
राजमाची लोहगडी लढे घेई तिकोण्यास || बाकी चारा किल्ल्यास ||
मावळ्यांस धाढी कोकणी गाव लुटायांस | धूर्त योजी फितुरास ||
सन्मान कैद्या देई पाठवी वीजापूरास | मुलान्या सुभेदारांस ||
विजापूरी मुसलमाना झाला बहू त्रास | योजना केली कपटांस ||
कर्नाटकी पत्र पाठवी बाजी घोरपड्यास | कैद तुम्ही करां शहाजीस ||
भोजनांचे निमित्त केले नेले भोसल्यास | दग्याने कैद केले त्यास ||
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास | खुशी मग झाली यवनांस ||
चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास | ठेविले भोक वार्‍यास ||
शाहाजीला पिडा दीली कळाले शिवाजीस | ऐकून भ्याला बातमीस ||
पिताभक्‍ती मनी लागला शरण जायास | विचारी आपल्या स्त्रियेस ||
साजे नाव सईबाई स्त्री सुचवी पतीस | ताडा दंडी दुसमनास ||
स्त्रीची सुचना सत्य आसली लिहीले पत्रास | पाठवी दिल्ली मोगलांस ||
चाकर झालो तुमचा आता येतो चाकरीस | सोडवा माझ्या पित्यास ||
मोगल थैली गेली थेट मुसलमानास | ठेविले किल्ल्यावर त्यास ||
बाजी शामराज का लाजला जात सांगायास | धरू पाही शिवाजीस ||
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणांस | आडचण झाली बखरीस ||
सिध्दीस बेत गेला नाही अंती भ्याला जिवास | काळे केले महाडास ||
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस | हा पाजी मुकला जातीस ||
करनाटकी आज्ञा झाली शाहाजीस | यवन भ्याला सिंहास ||
वर्षे चार झाली शिवला नाही कबजास | पिताभक्‍ती पुत्रास ||
चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस | दुसरे वासोट्या किल्ल्यास ||
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास | नवे योजी हुद्यास ||
आपली बाकी काढी धाढी पत्र तगाद्यास | चलाखी दावी मोगलांस ||
रात्री जाऊनी लुटी जुन्नरास | पाठवी गडी लुटीस ||
आडमार्ग करी हळूच गेला नगरांस | लुटी हत्तिघोड्यांस ||
उंच वस्त्रे, रत्ने होन कामती नाही द्रव्यास | चाकरी ठेवी बारगिरास ||
समुद्रतिरी किल्ले घेई पाळी गलबतास | चाकरी ठेवि पठाणास ||
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास | उदासी लाभ शिवाजीस ||
आबजूलखान शूर पठाण आला वाईस | शोभला मोठा फौजेस ||
हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस | कमी नाही दारूगोळिस ||
कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षिस | फितवीले लोभी ब्राम्हणास ||
गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास | चुकला नाही संकेतास ||
माते पायी डोई ठेवी, लपवी हत्यारास | बरोबर आला बेतास ||
समीप येता शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास | कमी करी आपल्या चालीस ||
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनांस | भ्याला तुमच्या शिपायांस ||
त्या अधमांचे एकून शिपाई केला बाजूस | लागला भेटू शिवाजीस ||
वर भेटभाव वाघनख मारी पोटास | भयभित केले पठाणास ||
पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस | झोंबती एकमेकांत ||
हातचलाखी केली विंचवा मारी शत्रूस | पठाण मुकला प्राणास ||
स्वामीभक्‍ती धाव घेई कळले शिपायास | राहिला उभा लढण्यास ||
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास | तान्हाजी भिडे बाजूस ||
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास | घाबरे केले दोघांस ||
नाव सय्यद बंडू साजे शोभा आणी बखरीस | लाथाळी जीवदानास ||
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस | न्याहाळी प्रेती धन्यास ||
उभयतांसी लढता मुकला आपल्या प्राणास | गेला जन्नत स्वर्गास ||
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस | पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ||
चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास | दुसर्‍या सरंजामास ||
अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यास | पाठवि विजापूरास ||
वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षीस | फितुर्‍या गोपीनाथास ||
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास|उपमा नाही आनंदास ||

||चाल ||
|| शिवाचा गजर जयनामाच झेंडा रोविला ||
||क्षेत्र्याचा मेळा मावळ्यांचा शिकार ख़ेळला ||
माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा | आर्शिवाद घेई आईचा ||
आलाबला घेई आवडता होता जिजीचा | पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा | पवाडा गातो शिवाजीचा ||३||

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास | केले मग सुरू खंडणीस ||
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास | नेमिला कोल्हापुरास |
स्वार तिन हजार घेई थोड्या पायदळास | आला थेट पन्हाळ्यास ||
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस | अति जेर केले त्यास ||
खंडणी घेत गेला भिडला विजापुरास | परत मग आला गडास ||
राजापुर दाभोळ लूटी भरी खजिन्यास | मात गेली विजापुरास ||
सिध्दीजोहरा नेमी मोठी फौज दिमतीस | सावंत सिद्दी कुमकेस ||
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास | करी मग जमा बेगमीस ||
वारंवार छापे घाली लुटी भौती मुलखास | केले महाग दाण्यास ||
त्रासाने खवळून वेढा घाली शिवाजीस | कोंडिले गडी फौजेस ||
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास | योजनां करी उपायास ||
कोकणांमधी सिध्दी झोडी रघुनाथास| उपद्रव झाला रयतेस ||
पासलकर बाजीराव पडाले वाडीस | दुःख मग झाले शिवाजीस ||
सिध्दी जोहरा निरोपाने गोवीं वचनास | खुशाल गेला भेटीस||
वेळ करून गेला उरला नाही आवकास | कच्चा मग ठेवी तहास ||
सिद्दिस लाडी गोडी मधी मान डुकलीस | गेला थाप देऊन गडास ||
सिद्द्या पोटी खुष्याली जाई झोपी सावकाश | हयगय झाली जप्तीस ||
तो शिवाजी पळून गेला घेई पाथी रात्रीस | सविले मुसलमानांस ||
सिद्दि सकाळी खाई मनी लाडू चुरमुर्‍यास | स्वारदळ लावी पाठीस ||
चढत होता खिंड शिवाजी गांठले त्यांस | बंदुका लावी छातीस ||
बाजीप्रभु मुख्य केला ठेवि मावळ्यास | एकटा गेला रांगण्यास ||
स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रुस | हरवी नित्य मोगलास ||
दोन प्रहर लढे वाट दिली नाही त्यास| धन्य त्याच्या जातीस ||
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास | खवळला बाजी युध्दास ||
अर्धे लोक उरले सरला नाही पाउलास | पडला प्रभू भूमीस ||
तो शिवाजी सुखी पोहचला कान सुचनेस | अंती मनी हाच ध्यास ||
बार गडी ऐकून सुखी म्हणे आपल्यास | निघून गेला स्वर्गास ||
सय्यद मागे सरे जागा देई बाजीरावास | पाहून स्वामीभक्‍तीस ||
विजापुरी मुसलमान करी तयारीस | खासा आला लढण्यास ||
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस | वश करी चाचे लोकांस ||
दळव्यासी लढून घेई श्रुंगारपुरास | मारले पाळेगारांस ||
लोकप्रितीकरीता करी गुरू रामदासास | राजगडी स्थापी देवीस ||
मिष्ट अन्नभोजन दिले सर्वा बक्षिस | केली मग मोठी मजलस ||
तानसैनी भले गवय्या बसवी गायास | कमी नाही तालस्वरास ||

||चाल ||
जीधर उधर मुसलमानी | बीसमिलाहि हिमानी ||
सचा हरामी शैतान आया | औरंगजीब नाम लिया ||
छोटे भाईकू हूल दिया | बडे भाईकी जान लिया ||
छोटे कूंबी कैद किया | लोक उसके फितालीया ||
मजला भाई भगादिया | आराकानमे मारा गया ||
सगे बापकूं कैद किया | हुकमत सारी छिनलीया ||
भाईबंदकू कैद किया | रयत सब ताराज किया ||
मार देके जेर किया | खाया पिया रंग उडाया ||
आपण होके बेलगामी | शिवाजीकू कहे गुलामी ||
आपण होके ऐषारामी | शिवाजीकू कहे हरामी ||
बेर हुवा करो सलामी | हिंदवाणी गाव नाभी ||

||चाल ||
आदी आंतन | सर्वा कारण ||
जन्ममरण | घाली वैरण ||
तोच तारण | तोच मारण ||
सर्व जपून | करी चाळण ||
नित्य पाळण | लावी वळण ||
भूती पाहून | मनी ध्याईन ||
नाव देऊन | जगज्जीवन ||
सम होऊन | करा शोधन ||
सार घेऊन | तोडा बंधन ||
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा | घेई मुजरा शाई(रा)चा ||
सुखसोहळे होता तरफडे सावंत वाडीचा | पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा || ४||

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास | मागे फौज कुमकेस ||
बाजी घोरपडा बल्लोळखान येती सहाय्यास | शिवाजी करी तयारीस ||
खरा करून गेला छापा घाली मुधोळास | मारिले बाजी घोरपड्यास ||
भाऊबंद मारिले बाकी शिपाई लोकांस | घेतले बापसूडास ||
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस | धमकी देई पोर्तुगीस ||
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस | बांधिले नव्या जहाजास ||
जळी सैनापती केले ज्यास भिती पोर्तुगीस | शोभला हुद्दा भंडार्‍यास ||
विजापुरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस | उभयता आणिले एकीस ||
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस | शिवाजी लागे चरणास ||
शाहाजीचे सदगुण गाया नाही आवाकाश | थोडेसे गाऊ अखेरीस ||
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास | उणे स्वर्गी सुखास ||
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास | भेट मग देई यवनास ||
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊन लक्षास | साजे यवनी स्नेहास ||
विजापुरचा स्नेह होता लढे मोगलास | घेतले बहूता किल्ल्यास ||
सर्व प्रांती लूट धूमाळी आणिले जेरीस | घाबरे केले सर्वांस ||
संतापाने मोगल नेमी शाइस्तेखानेस | जलदि केली घेई पुण्यास ||
चाकणास जाऊन दावी भय फिर्डोजीस | फुकट मागे किल्ल्यास ||
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस | खान खाई मनास ||
आखेर दारू घालून उडवी एका हुकूमास | भीति आंतल्या मर्दास ||
लागोपाठ मार देत हटवि पठाणास | खचला खान हिंमतीस ||
प्रातःकाळी संतोषाने खाली केले किल्ल्यास | देई मुसलमानास ||
फिर्डोजीला भेट देता खुषी झाली यवनास | देऊन मान सोडी सर्वास ||
शिवाजीची भेट देता खुषी झाली यवनास | वाढवी मोठ्या पदवीस ||
फिर्डोजीचे नाव घेता मनी होतो उल्हास | पीढिजाद चाकरीस ||
येशवंतसिंग आले घेऊन मोठ्या फौजेस | मदत शाईस्तेखानेस ||
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास | जाळून पाडिला ओस ||
पाठी लागून मोंगल मारी त्याच्या स्वारांस | जखमा केल्या नेताजीस ||
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास | पाहून मोगलसेनेस ||
जिजीबाईचे मुळचे घर होते पुण्यास | खान राही तेथे वस्तीस ||
मराठ्यास चौकी बंदी गावात शिरण्यास | होता, भित शिवाजीस ||
लग्नवर्‍हाडी घुसे केला पुण्यात प्रवेश | मावळे सोबत पंचवीस ||
माडिवर जाऊन फोडी एका खिडकीस | कळाले घरांत स्त्रीयांस ||
शाइस्त्यास कळता दोर लावी कठड्यास | लागला खाली जायास ||
शिवाजीने जलदी गाठून वार केला त्यास | तोडिले एका बोटास ||
स्त्रिपुत्रा सोडून पळे पाठ दिली शत्रूस | भित्रा जपला जिवास ||
आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस | उपमा नाही हिजड्यास ||
सर्व लोकांसहीत मारीले खानपुत्रास | परतला सिंहगडास |
डौलाने मोगल भौती फिरवी तरवारीस | दावी भय शिवाजीस ||
समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस | शत्रू पळाला भिऊन मारास ||
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास | मुख्य केले माजमास ||
राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस | दावी भय पोर्तुगास ||
सर्व तयारी केली निघाला नाशिक तिर्थास | हुल कसी दिली सर्वास ||
मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस | दाखल झालो सुर्तेस ||
यथासांग सहा दिवस लुटी शहरास | सुखी मग गेला गडास ||
बेदनूराहून पत्र आले देई वाचायास | आपण बसे ऐकायास ||
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस | लागले हरणापाठीस ||
घोड्या ठेंच लागे उभयता आले जमीनीस |शाहाजी मुकला प्राणास ||
पती कैलासा गेले कळाले जिजीबाईस |  पार मग नाही दुःखास ||
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस | घेई पुढे शिवाजीस ||

||चाल ||
अतिरूपवान बहु आगळा | जैसा रेखला चित्री पूतळा ||
सवतीवर लोटती बाळा | डाग लाविला कुणबी कुळा ||
सवतीला कसे तरी टाळा | कज्जा काढला पती मोकळा ||
खर्‍या केसाने कापि का गळा |नादी लागला शब्द कोकीळा ||
मुख दुर्बळ राही वेगळा | अती पिकला चिंतेचा मळा ||
झाला शाहाजी होता सोहळा | मनी भूलला पाहूनी चाळा ||
बहुचका घेती जपमाळा | जाती देऊळा दाविती मोळा ||
थाट चकपाक नाटक शाळा | होती कोमळा जशा निर्मळा ||
खर्‍या डंखिणी घाली वेटोळा | विषचुंबनी देती गरळा ||
झाला संसारी अती घोटाळा | करी कंटाळा आठी कपाळा ||
मनी भिऊन पित्याच्या कुळा | पळ काढला गेले मुताळा ||
छातीवरी ठेवल्या शिळा | नाही रुचला सवत सोहळा ||

कमानीवर | लावले तीर ||
नेत्रकटार | मारी कठोर ||
सवदागर | प्रीत व्यापार ||
लावला घोर | सांगते सार ||
शिपाई शूर | जुना चाकर ||
मोडक्या धीर | राखी नगर ||
आमदानगर | विजापूरकर ||
मंत्रि मुरार | घेई विचार ||
वेळनुसार | देई उत्तर ||
धूर्त चतुर | लढला फार ||
छाती करार | करी फीतूर ||
गुणगंभीर | लाविला नीर ||
होता लायक | पुंडनायक ||
स्वामीसेवक | खरा भाविक ||

सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा | बजावला धर्म पुत्राचा ||
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा | शत्रु होता आळसाचा ||
दुःखामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा | पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा ||५||

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास | शिक्का सुरू मोर्तबास ||
अमदानगरी नटून फस्त केले पेठेस | भौती औरंगाबादेस ||
विजापूरची फौज करी बहुत आयास | घेई कोकणपटीस ||
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस | ठोकून घेई सर्वास ||
जळी फौज लढे भौती मारी गलबतास | दरारा धाडी मक्केस ||
मालवणी घेऊन गेला अवचित फौजेस | पुकारा घेतो मोगलास ||
जहाजावर चढवी फौज गेला गोव्यास | लुटले बारशिलोरास ||
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास | लुटले मोगल पेठांस ||
पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटिस | आज्ञा जावे रायगडास ||
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जहाजास | निघाला मुलखी जायास ||
मोठा वारा सुटला भ्याला नाही तुफानास | लागले अखेर कडेस ||
औरंगजेब पाठवी राजा जयशिंगास | दुसरे दिलीरखानास ||
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास | वेढिले बहुता किल्ल्यास ||
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस | सुचेना काही कोणास ||
बाजी प्रभू भ्याला नाही दिलीरखानास | सोडिले नाही धैर्यास ||
हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस | संभाळी पुरंधरास ||
चार्तुयाने लढे गुंतवी मोगल फौजेस | फु्रसत दिली शिवाजीस ||
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस | भिडला किल्ला माचीस ||
बुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडण्यास | योजी अखेर उपायास ||
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास | पिडीले फार मोगलास ||
मोगलाने श्रम केले बेत नेला सिध्दिस | काबीज केले माचीस ||
यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस | चुकले सावधपणास ||
हेटकर्‍यांचा थाट नीट मारी लुटार्‍यास | मोगल हटले नेटास ||
बाजी मावळ्या जमवी हाती घेई खांड्यास | भिडून मारी मोगलांस ||
पळ काढी पाठ दिली मावळ्यास | मर्द पाहा भ्याले उंदरास ||
लाजे मनी दिलीरखान जमवी फौजेस | धीर काय देई पठाणास ||
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास | जाऊन भिडला मावळ्यास ||
बाजी मार देई पठाण खचले हिंमतीस | हटती पाहून मर्दास ||
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास | लावीला तीर कमानीस ||
नेमाने तीर मारी मुख्य बाजी प्रभुस | पाडिला गबरू धरणीस ||
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस | सरले बालेकिल्ल्यास ||
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस | धमकी देती मावळ्यास ||
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस | पळवी इशानी कोणास ||
वज्रगडाला शिडी लावली आहे बाजूस | वरती चढवी तोफांस ||
वरती मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास | आणले बहु खराबीस ||
हेटकरी मारी गोळे बालेकिल्ल्यास | आणले बहु खराबीस ||
हेटकरी मावळे भ्याले नाही भडिमारास | मोगल भ्याला पाऊसाअ ||
मोगल सल्ल करी शिवाजी नेती मदतनीस | घेती यवनी मुलखास ||
कुलद्रोही औरंगजेब योजी कपटास | पाठवी थैली शिवाजीस ||
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस | नजरकैद करी त्यास ||
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस | ठेविले जवळ पुत्रास ||
दरबार्‍या घरी जाई देई रत्न भेटीस | जोडीला स्नेह सर्वास ||
दुखणे बहाणा करी पैसा भरी हाकीमास | गूल पाहा औरंगजेबास ||
आराम करून दावी सुरू दानधर्मास | देई खाने फकीरास ||
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदिस | जसा का मुकला जगास ||
दानशूर बनला हटवी हातिमताईस | चुकेना नित्यनेमास ||
औरंगजेबा भूल पडली पाहून वृत्तीस | विसरला नीट जप्तीस ||
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास | चढला मोठ्या दिमाखास ||
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटांस | बाकी सोपी चाकरास ||
जलदी करीती चाकर नेती टोकरांस | करामत केली रात्रीस ||
दिल्ली बाहेर गेले खुले केले शिवाजीस | नेली युक्‍ती सिध्दीस ||
मोगल सकाळी विचकरी दांत खाई होटांस | लावि पाठी माजमास ||

|| चाल ||
औरंगजेबीचा धूर दीला | पुत्रासवे घोडा चढला ||
मधीच ठेवी पुत्राला | स्वताः गोसावी नटला ||
रात्रीचा दिवस केला | गाठले रायगडाला ||
माते चरणी लागला | हळूच फोडी शत्रूला ||
स्नेह मोगलांचा केला | दरारा देई सर्वाला ||

||चाल ||
हैद्राबादकर | विजापूरकर ||
कापे थरथर | देती कारभार ||
भरी कचेरी | बसे विचारी ||
कायदे करी | नीट लष्करी ||
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा | बंदोबस्त केला किल्ल्याचा ||
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा | पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||६||

शिवाजी तो मसलत देई मित्र तान्हाजीला | बेत छाप्याचा सुचवीला ||
तान्हाजीने भाऊ धाकटा सोबत घेतला | मावळी हजार फौजेला ||
सुन्या रात्री सिंहगड पायी जाऊन ठेपला | योजिले दोर शिडिला ||
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला | हळूच वर चढवीला ||
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला | करी तयार लोकाला ||
थोड्या लोकांसवे तान्हाजी त्यावर पडला | घाबरा गढकरी केला ||
रणी तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला | सुर्याजी येऊन ठेपला ||
धीर मोडक्या देई परत नेई सर्वाला | उगवी बंधु सुडाला ||
उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला | घेतले सिंहगडाला ||
गढ हाती लागला तान्हाजी बळी घेतला | झाले दुःख शिवाजीला ||
संहगडी मुख्य केले धाकट्या सुर्याजीला | रुप्याची कडी मावळ्याला ||
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला | पिडा जंजिरी सिद्द्याला ||
सुरत पुन्हा लुटी मार्गी झाडी मोगलाला | मोगल जेरदस्त केला ||
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला | त्यामधी अनेक स्त्रियांला ||
सुंदर स्त्रिया परत पाठवी ख़ानदेशाला | सुरू केले चौथाईला ||
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला | देई मोठ्या फौजेला ||
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला | धिंगाणा दक्षिणेत केला ||
गुजर उडी घाली सामना शत्रुचा केला | मोरोबा पठाण पंक्‍तीला ||
लढता पळ काढी दावी भ्याला मोगलाला | जसा खरा मोड झाला ||
तो मराठे पळती मोगल गर्वाने फुगला | आळसाने ढिला पडला ||
गुजर संधी पाहून परत मुरडला | चुराडा मोगलाचा केला ||
बेवीस उमराव पाडले रणभूमीला | नाही गणती शिपायाला ||
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्याला | पाठवी रायगडाला ||
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला | खिदाडी औरंगाबादेला ||
रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला | गोडबोल्या गोवी ममतेला ||
एकसारखे औषध पाणी देई सर्वाला | निवडले नाही शत्रूला ||
जखमा बर्‍या होता खुलासा सर्वांचा केला | राहिले ठेवी चाकरीला ||
शिवाजीचू किर्ती चौमुलखी डंका वाजला | शिवाजी धनी आवडला ||
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला | हाजरी देती शिवाजीला ||
पोर्तुग्यास धमकीही देई मागे खंडणीला | बंदरी किल्ला वेढीला ||
मधीच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला | बनया धर्मा आड झाला ||
दिल्लीस परत नेले सुलतान माजूमाला | दुजे मोहबतखानाला ||
उभयतांचा बदली खानजहान आला | मुख्य दक्षीणेचा केला ||
मोगलाला धूर देऊन लुटले मुलखाला | गोवळकुंडी उगवला ||
मोठी खंडणी घेई धाकरी धरी निजामाला | सुखे मग रायगडी गेला ||
मोगलाचे मुलखी धाडी स्वार लुटायाला | लुटले हुबळी शहराला ||
समुद्रकाठी गावे घेई जाहाजाला | केले खुले देसाईला ||
परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला | आणिक चार किल्ल्यांला ||

|| चाल ||
हुकूम विजापुरी झाला | सोडिले बहुत फौजेला ||
द्यावा त्रास शिवाजीला | घ्यावे त्याचे मुलखाला ||
शिवाजी सोडी गुजराला | कोंडी आबदुल करीमाला ||
केला महाग दाण्याला | शत्रू अती जेर केला ||
आर्जव करणे शिकला | भोंदिले सैनापतीला ||
निघून विजापुरी गेला | क्रोध शिवाजीस आला ||
रागाऊन लिहीले पत्राला | निषेधी प्रतापरावाला ||
गुजर मनात लाजला | निघून वर्‍हाडात गेला ||

||चाल ||
आबदुल्याने | बेशर्म्याने ||
फौज घेऊन | आला निघून ||
राव प्रताप | झाला संताप ||
आला घाईने | गाथी बेताने ||
घुसे स्वताने | लढे त्वेषाने ||
घेई घालून | गेला मरून ||
प्रतापराव पडता मोड फौजेचा झाला | पाठलाग मराठ्यांचा केला ||
तोफ गोळ्या पोटी पोटी दडती भिडती पन्हाळ्याला | गेले नाही शरण शत्रूला ||
अकस्मात हंसाजी मोहीता प्रसंगी आला | हल्ला शत्रूवर केला ||
गुजर दळ मागे फिरून मारी यवनाला | पळिवले विजापुरला ||
शिवाजीने हंसाजीला सरनौबत केला | शिवाजी मनी सुखी झाला ||
सेनापतीचे गुण मागे नाही विसरला | पोशी सर्व कुटूंबाला ||
प्रतापराव – कन्या सून केली आपल्याला | व्याही केले गुजराला ||
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा | केला खेळ गारूड्याचा ||
लुटारू शिवाजी लुटला धाक गृहफौजेचा | खर्च नको दारूगोळीचा ||
बहुरूपी सोंग तूलदान सोने घेण्याचा | पवाडा गातो भोसल्याचा ||
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||७||


विश्वासू चाकर नेमी मुलखी लुटायाला | शिवाजी कोकणांत ||
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला | जमाव फौजेचा केला ||
गोवळकुंडी जाई मागून घेई तोफाला | फितीवले कसे निजामाला ||
करनाटकी गेला भेटे सावत्रभावाला | वाटणी मागे व्यंकोजीला ||
लोभी व्यंकोजी हिस्सा देईन बळासी आला | आशेने फिरवी पगडीला ||
बंधू आज्ञा मोडून गर्वाने हट्टी पेटला | बिर्‍हाडी रागाऊन गेला ||
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला | कैदी नाही केले भावाला ||
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला | खडा कानाला लावला ||
दासीपुत्र संताजी बंधू होता शिवाजीला | करनाटकी मुख्य केला ||
हंबीरराव सेनापती हाताखाली दिला | निघाला परत मुलखाला ||
वाटेमध्ये लधून घेई बिलरी किल्ल्याला | तेथे ठेवी सुमंताला ||
शिवाजीचे मागे व्यंकोजीने छापा घातला | घेतले स्वःता अपेशाला ||
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला | शिवाजी रायगडी गेला ||
विजापूराचा साह्य नेई राजे शिवाजीला | मोगल मुलखी सोडला ||
मुलखी धिंगाणा धुळीस डेश मिळवीला | सोडिला नाही पिराला ||
वाटेमधी मोगल गाठी शिवाजीला | ग़्हाबरा अतिशय केला ||
भिडला शिवाजी मोगल मागे हाटीवला | वाट पुढे चालू लागला ||
दुसरी फौज आडवी माहारज राजाला | थोडेसे तोंड दिले तिजला ||
काळ्या रात्री हळूच सुधरी आडमार्गाला | धूळ नाही दिसली शत्रूला ||
फौजसुध्दा पोहचला पटा किल्ल्याला | फसविले आयदी मोगलाला ||
विजापुरचा आर्जव करी धडी थैलीला | आश्रय मागे शिवाजीला ||
हांबीरराव मदत पाठवी विजापुरला | बरोबर देई फौजेला ||
नऊ हजार मोगलांचा पराभव केला | ज्यानी मार्ग अडीवला ||
विजापुरी जाऊन जेर केले मोगलाला | केला महाग दाण्याला ||
शत्रुला पिडा होता त्रासून वेढा काढला | मोगल भिऊन पळाला ||
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला | पाठवी शाहजहानाला ||
जलदी करून शिवाजी वळवी पुत्राला | लाविला नीट मार्गाला ||
तह करून शिवाजी नेती विजापुरला | यवन घेती मसलतीला ||
शिवाजीचे सोवळे रुचले नाही भावाला | व्यंकोजी मनी दचकला ||
निरस मनी होऊन त्यागी सर्व कामाला | निरा संन्यासी बनला ||
शिवाजीने पत्र लिहीले बंधु व्यंकोजीला | लिहीतो पत्र अर्थाला ||
वीरपुत्र म्हणविता गोसावी कसे बनला | हिरा का भ्याला कसाला ||
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला | मळावाचून काटला ||
कनिष्ठ बंधु माझ्या लाडकी पाठी साह्याला | तुम्ही का मजवर रुसला ||
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला | त्यागा ढोंगतोर्‍याला ||
मन उत्तम कामी जपा आपल्या फौजेला | संभाळा मुळ आब्रुला ||
किर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला | नित्य जपतो या जपाला ||
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला | सोड मनच्या आधीला ||
सुबोधाचे पत्र ऐकता शुध्दीवर आला | व्यंकोजी लागे कामाला ||
शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला | रोगाने अती जेर केल ||
त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला | शिवाजी सिसी दुःखाला ||
यवनी विरास भिडता नाही कुचमला | शिवाजी रोगाला भ्याला ||
सतत सहा दिवस सोसी तापदहाला | नाही जरा बरळला ||
सातव्या दिवशी शिवाजी करी तयारीला | एकटा पुढे आपण झाला ||
काळाला हूल देऊन स्वःता गेला स्वर्गाला | पडले सुख यवनाला ||
कुळवाडी मनी खचले करती शोकाला | रडून गाती गुणाला ||

||चाल ||
महाराज आम्हांसी बोला | धरल का तुम्ही आबोला ||
मावळे गडी सोबतीला | शिपाई केले उघड्याला ||
सोसिले उन्हातान्हाला | भ्याला नाही पावसाला ||
दोंगर कंगर फिरला | यवन जेरीस आणला ||
लुटले बहूत देशांला | वाढवी आपुल्या जातीला ||
लढवी अचाट बुध्दीला | आचंबा भुमीवर केला ||
बाळगी जरी संपत्तीला | तरी बेताने खर्च केला ||
वाटणी देई शिपायाला | लोभ द्रव्याचा नाही केला ||
चतुर सावधपणाला | सोडिले सोडिले आधी आळसाला ||
लहान मोठ्या पागेला | नाही कधी विसरला ||
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला | नाही दुसरा उपमेला ||
कमी नाही कारस्तानीला | हळूच वळवी लोकांला ||
युक्‍तीने बचवी जीवाला | कधी भिईना संकटाला ||
चोरघर्ती घेई किल्ल्याला | तसेच बाकी मुलखाला ||
पहिला झटे फितुराला | आखेर करी लाढाईला ||
युध्दी नाही विसरला | लावी जीव रयतेला ||
टळेना रयत सुखाला | बनवी नव्या कायद्याला ||
दाद घेई लहानसानाची | हयगय नव्हती कोणाची ||
आकृती वामनमुर्तीची | वळापेक्षा चपळाईची ||
सुरेख ठेवण चेहर्‍याची | कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ||

||चाल ||
भिडस्त भारी | साबडा घरी ||
प्रिय मधुरी | भाषण करी ||
मोठा विचारी | वर्चड करी ||
आस सोयरी | ठेवी पदरी ||
लाडावरी | रागाचे भारी ||
इंग्लीश ज्ञान होता म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा | उडवी फट्टा ब्रम्हाचा ||
जोतिराव फु्ल्याने गाईला पुत क्षुद्राचा | मुख्य धनी पेशव्याचा ||
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा | पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||८||Tuesday, January 29, 2013

While creating career...

         As there is large competition to get a job in industry field, because of there is large number of candidate getting pass out but opportunity at market is with that proportion. Too less candidate get select at campus interview at college, then it becomes problem to search the job in industry. It comes frustration to find the job with as per our need.

   There are many fake people and fake companies in industry to provide the job. They settled well to make fraud with student. They takes bit amount of money from candidates for giving opportunity in MNC type of company. I have gone this stage, many students are get cheated by fake people. Its my humble request to student to get the job, they should keep patience and calm and have keep searching job. If student should not loose hi/her hopes he must get to have good job. There are around one lack engineer gets pass out per years though over all Maharashtra.  Government has made the number of seats as per requirements. 

        I gone through all type frustration  and I was jobless too. But had keep searching. Now, I am bit satisfied with job. Actually around 2009-10 there was bit recession due slag in America market. India has mostly project of abroad countries so there was lack of requirements. Employee demands is derived demands. that is, hiring employee is not desired for its own sake but rather because its on producing output. and other addition demand of employee is depends on Marginal demand of product and cost. But I observe so many candidates blame themselves and gone through frustration they return to home with searching job with their level best. 

          Ahead, We don't know when market will collapse, when we will face the recession till that every-one should make their strong.

माझ इवलस गांव


घेतं मन माझं 
पुन्हा तिकडच धांव 
आहे भीमेच्या तीरावर 
माझं इवलस गांव 

गावं माझं जणू देवभोळं 
गाई इठूबाच गाणं
म्हणे इठू माझा देव
माझं जिणं तेचं देणं
आहे भीमेच्या तीरावर 
माझं इवलस गांव 

काय सांगू  रे 
माझ्या गावाची कथा  
माती नेसली इथं 
जणू हिरवा अंगरखा 
गावच्या या मातीत 
पिकत रे सोनं 
आहे भीमेच्या तीरावर 
माझं इवलस गांव 

माझ्या गावाचा गोडवा 
मले आठव आठव 
निखळ मायेचा झरा 
पुन्हा साठव साठव 
माझ्या काळजाचा ठाव 
आहे भीमेच्या तीरावर 
माझं इवलस गांव 

- गणेश.

Monday, January 28, 2013

राजकारण...


               देशाच्या घटनेला आज ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने  संविधाननुसार कारभार चालवत आपल्या लोकशाहीचा आदर्श जगापुढे ठेवला आहे. भारतीय समाज व्यवस्थेत  व्यक्ती-स्वातंत्र्य,  अर्थकारण, समाजकारण याबरोबर राजकारण हा देखील महत्वाचा घटक आहे. 

                आज-काल राजकारणाकडे बघण्याचा लोक्कांचा दृष्टीकोन कसा आहे, सांगावे लागत नाही. नुकत्याच पार पडलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनात तर सर्व भारतीय राजकारणाविषयी द्वेषाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकारण वाईटच असा एल्गार अण्णांनी अनेकवेळा दिला. केजरीवाल यांनी राजकारणाचा योग्य पर्याय निवडला. जर सिस्टमला बदलायचे असेल  तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही. 

                 येथे सांगण्यासारखे एवढेच आहे की, राजकारण करण्याचे मुद्दे  समाज सुधारणेचे , देश हिताचे,विकासाचे असावेत. सत्ताधारी आणि विरोधाकामधील टीका करण्याचे शैली द्वेषात्मक नसून समाजाच्या प्रभाविशाली दृष्टीकोनातून असावी. आज-काल मिडीयाने समाजासमोर सर्वच राजकीय नेत्यांची एक अनपेक्षित प्रतिमा ठेवली आहे.  सोशल नेटवर्किंग साईट्सवर सुद्धा नेत्यांबद्दल अतिशय खालच्या  स्तरावर कमेंट्स पडतात. हे चित्र पाहून, अतिशय कीव वाटते. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशाने  प्रत्येक नागरिकाला व्यक्ती- स्वातंत्र्य दिले खरे पण त्याचा उपयोग सु-संयोग पद्धतीने व्हायला हवा.  

    आज काल राजकारणात "याच्यामागे एक घाणेरडे राजकारण आहे?" असे शब्द कानी पडतात. चित्र बदलायचे असेल तर त्यासाठी तरुणांनीच सिस्टममध्ये उतरले पाहिजे. स्व:स्वार्थ बाजूला ठेवून देशहिताचे उद्दिष्ठ नजरेसमोर ठेवले पाहिजे, अशी अंतकारातून तळमळ राजकारणातून देशाला दिसली पाहिजे.  तेव्हा कुठे तरुण वर्गाला देशहित कार्यासाठी व्यासपीठ मिळेल .

Monday, January 14, 2013

आज पुन्हा गावाकडची आठवण आली...

पहाटे कधी केव्हा जाग आली,
गारवा घेवूनी धुक्याची लाट आली..
वेदनांना वाहून नेले,
सूर्य नव्याने उगवायला उभारी आली...
गारव्याच्या ऋतूचे बोट पकडुनी,
अंकुरतील तराणे दवबिंदूंना झेली...
जीव पुन्हा पुन्हा कासावीस नको,
ते सर्व थंडीसवे वाहून जाई...
पुन्हा नव्यानं काही उगवून येई...
मला पहाटे कधी केव्हा जाग आली,
आज पुन्हा गावाकडची आठवण आली....!

हरेक सकाळ अशी नवी,
फांद्यांना छेडणाऱ्या किरणातुनी,
पक्षीही घेवून गेले भरारी...
सूर-पारब्यांच्या झाडावर चढुनी,
दिस असे गेले किती सरुनी...
आज का डोळे झाले चिंब अश्रूंनी,
का कोणास ठावूक एकाकी...
मला पहाटे कधी केव्हा जाग आली, 
आज पुन्हा गावाकडची आठवण आली....!
                                                                         - गणेश.