Friday, December 30, 2011

मीडियाची दहशत...

            आज आमच्या प्रत्येक घरी शिवरायांचे धडे गिरवायला पाहिजेत, तिथ आज खानच टीव्हीवर आहेत.  ज्या घरात पोवाड्याने दिवसाची सुरुवात व्हायला हवी तिथं आज पाश्चिमात्य गाण्याने सुरुवात होतीय, जिथे ज्ञानाचा प्रसार करून गेले संत, तिथं येऊन बसल्यात या राखी सावंत! आज याच टीव्हीवाल्यांनी नको त्या सामान्य लोकांना  एव्हरेस्टवर नेलं.

                       क्रिकेट-वर्ल्ड कप २०११ मधील भारत-पाक सामना झाला होता, पराभवानंतर पाकिस्तान मायदेशी परतला, "भारतीय मिडिया न्यूट्रल नाही, त्यांनी क्रिकेट सामना हा एक सामना आहे या द्रुष्टीकोनातून पाहिले नाही!" अशी टिप्पणी पाकचा कर्णधार शहीद आफ्रिदीने पाकमध्ये दिली. समजू, पराभवी लोक कारणेच देत राहतात. पण याच मिडियाचे  मुंबईतले ऑफिस शिवसैनिकांनी फोडलं होत. याच मीडियामुळे २६-११ च्या घटनेत मुंबई पोलिसांच्या प्लानच चित्र ताजमध्ये लपलेले अतिरेकी पाहू शकले. याच मेडीयामुळे, विदर्भात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनांवर पाय दिला जातो. जेव्हा भारतीय शाषण व्यवस्थेचा एखादा व्यक्ती आपले विचारांचा प्रसार करू पाहत असतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दाला आज मिडिया एक आवाहन बनून बसले आहे. आज मिडिया टीका-टिप्पणी सोडून विरोधी विचार, उग्र शब्द, मंत्र्याबद्द्ल मनात द्वेषच निर्माण करणारी भूमिका जोपासत असताना दिसते. 

                 वृतपत्रे आणि रेडीओ यांच्यामुळेही काल घरोघरी बातम्या पोहचतच होत्या, पण आज सकाळ, संध्याकाळच्या ७ च्या बातम्या  ऐकण्याचा उताविळपणा हरवला आहे, हि वस्तुस्तिथी आहे. लोकशाहीचा विचार करता, मिडियाला कायद्यात कोठेही स्थान नाही, परंतु मिडियामुळेच आण्णा हिरो झाले आणि लोकांनी निवडून दिलेल्या सरकारमुळे झिरोहि झाले.  RTI  हा आण्णांनी केवळ महाराष्ट्रात आणला तो संसदेत सभासदांनी मंजूर आधीच केला होता. वास्तव पाहिले असता,  भारतीय लोकशाहीचे केवळ तिन स्तंभ आहेत. आणि ते म्हणजे कायदेमंडल,न्यायपालिका आणि प्रशासन हे होय.यामध्ये कुठेही सतत्त्याने सांगितली जाणारी ''तथाकथित पत्रकारिता" याचा समावेश नाही. त्यामुळे मिडियाला कायदेमंडळाशी जोडू नये. अण्णांना वापरून मिडियानेच कायदे बद्ण्याची चाल चालली पण आज ही मिडिया कोणाकडे आहे ? हा प्रश्न सामान्यांना पडत नाही., अण्णांना पाहून लोकही आक्रमक झाले होते, पण विजय लोकशाहीचा झाला.

                  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिडियावर बंदी आणायचे उद्गार काढले असताच, त्यांना कशाला दोष देता ? या शब्दात विरोधकांनी टीका केली होती परंतु याच विरोधांनी मिडियाच ऑफिस फोडलं होत याच ते भाष्य करत नाहीत. नन्तर मिडियावर वॉच ठेवायला एक कमिटी स्थापन होईन अशी घोषणा पवारांनी केली, कारण बातमी घडत कमी असते, ती बनवली जाते.