Friday, December 30, 2011

मीडियाची दहशत...

            आज आमच्या प्रत्येक घरी शिवरायांचे धडे गिरवायला पाहिजेत, तिथ आज खानच टीव्हीवर आहेत.  ज्या घरात पोवाड्याने दिवसाची सुरुवात व्हायला हवी तिथं आज पाश्चिमात्य गाण्याने सुरुवात होतीय, जिथे ज्ञानाचा प्रसार करून गेले संत, तिथं येऊन बसल्यात या राखी सावंत! आज याच टीव्हीवाल्यांनी नको त्या सामान्य लोकांना  एव्हरेस्टवर नेलं.

                       क्रिकेट-वर्ल्ड कप २०११ मधील भारत-पाक सामना झाला होता, पराभवानंतर पाकिस्तान मायदेशी परतला, "भारतीय मिडिया न्यूट्रल नाही, त्यांनी क्रिकेट सामना हा एक सामना आहे या द्रुष्टीकोनातून पाहिले नाही!" अशी टिप्पणी पाकचा कर्णधार शहीद आफ्रिदीने पाकमध्ये दिली. समजू, पराभवी लोक कारणेच देत राहतात. पण याच मिडियाचे  मुंबईतले ऑफिस शिवसैनिकांनी फोडलं होत. याच मीडियामुळे २६-११ च्या घटनेत मुंबई पोलिसांच्या प्लानच चित्र ताजमध्ये लपलेले अतिरेकी पाहू शकले. याच मेडीयामुळे, विदर्भात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनांवर पाय दिला जातो. जेव्हा भारतीय शाषण व्यवस्थेचा एखादा व्यक्ती आपले विचारांचा प्रसार करू पाहत असतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दाला आज मिडिया एक आवाहन बनून बसले आहे. आज मिडिया टीका-टिप्पणी सोडून विरोधी विचार, उग्र शब्द, मंत्र्याबद्द्ल मनात द्वेषच निर्माण करणारी भूमिका जोपासत असताना दिसते. 

                 वृतपत्रे आणि रेडीओ यांच्यामुळेही काल घरोघरी बातम्या पोहचतच होत्या, पण आज सकाळ, संध्याकाळच्या ७ च्या बातम्या  ऐकण्याचा उताविळपणा हरवला आहे, हि वस्तुस्तिथी आहे. लोकशाहीचा विचार करता, मिडियाला कायद्यात कोठेही स्थान नाही, परंतु मिडियामुळेच आण्णा हिरो झाले आणि लोकांनी निवडून दिलेल्या सरकारमुळे झिरोहि झाले.  RTI  हा आण्णांनी केवळ महाराष्ट्रात आणला तो संसदेत सभासदांनी मंजूर आधीच केला होता. वास्तव पाहिले असता,  भारतीय लोकशाहीचे केवळ तिन स्तंभ आहेत. आणि ते म्हणजे कायदेमंडल,न्यायपालिका आणि प्रशासन हे होय.यामध्ये कुठेही सतत्त्याने सांगितली जाणारी ''तथाकथित पत्रकारिता" याचा समावेश नाही. त्यामुळे मिडियाला कायदेमंडळाशी जोडू नये. अण्णांना वापरून मिडियानेच कायदे बद्ण्याची चाल चालली पण आज ही मिडिया कोणाकडे आहे ? हा प्रश्न सामान्यांना पडत नाही., अण्णांना पाहून लोकही आक्रमक झाले होते, पण विजय लोकशाहीचा झाला.

                  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिडियावर बंदी आणायचे उद्गार काढले असताच, त्यांना कशाला दोष देता ? या शब्दात विरोधकांनी टीका केली होती परंतु याच विरोधांनी मिडियाच ऑफिस फोडलं होत याच ते भाष्य करत नाहीत. नन्तर मिडियावर वॉच ठेवायला एक कमिटी स्थापन होईन अशी घोषणा पवारांनी केली, कारण बातमी घडत कमी असते, ती बनवली जाते.Wednesday, December 14, 2011

शिवरायांचा मावळा आहे मी..!तसं पाहायला गेलं तर,
जरा निराळा आहे मी!
लिहिण्या घेतली लेखणी,
परतण्या इतका दुबळा नाही मी!
बाबासाहेबांचे विचार जपणारा,
शिवरायांचा मावळा आहे मी!

सह्याद्रीत हर हर महादेवचा,
घुमलेला नाद आहे मी!
फुलेंच्या पोवाड्यातील,
डफावरची थाप आहे मी!
राजे पोहोचता पन्हाळगडा,
त्याज पायाचा  धुरळा आहे मी!

शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब आहे मी!
अशाच दोन ओळींचा कवी आहे मी,
शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर,
विचारांचा पाईक आहे मी!
फक्त आणि फक्त शिवरायांचा भक्त आहे मी!


Friday, December 9, 2011

... आणि सगळे हसले!!!


      मी सातवीत होतो तेव्हाचा प्रसंग आहे. उद्या २ अक्टोबर असल्यामुळे  गांधी जयंतीचा कार्यक्रम होणार होता.  सुट्टी असूनही कार्यक्रमासाठी शाळेत जावे लागणार होते. कार्यक्रम झाल्यानंतर शिक्षकांची अन मोजक्या मुलांची भाषणे होणार होती. दोन-अडीच तासाचा कार्यक्रम झाल्यानंतर शाळा नव्हती त्यामुळे आम्ही जाम खुश होतो.  सुपेकर सर  आमचे मराठीचे शिक्षक होते. ज्यांनी काही मुलांना भाषण करायला प्रोत्साहित केल होत, त्यात मीही होतो. छोटा कार्यक्रम असल्याने आपल्याला कंटाळा येईल असे काही कुणाच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हते. नेहमीप्रमाणे वर्गानुसार रांगा बनत होत्या.  मी सातवीच्या रांगेत पहिला होतो, मनात भाषणाच्या ओळी आठवणे चालू होते, माझ्या भाषणाला अजून अवकाश  होता. त्या अगोदर जे नेहमी कार्यक्रमला असतात आणि आताही आलेले शाळेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. शे. भोसले प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.

    कार्यक्रम सुरु झाला, गांधीच्या प्रतिमेचे पूजन झाले, पाहुण्याच्याआगोदर विद्यार्थ्यांची भाषणे सुरु झाली.   सुपेकर सर यादीतून विद्यार्थ्यांचे एक-एक नाव घेत होते. माझ्या आगोदर महावीर लोखंडेचे भाषण होणार  होते, त्याच्या तोंडावर बरीचशी प्रश्नचिन्ह नाचताना दिसत होती बहुदा त्याचे भाषण पाठ झाले नसावे.
अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो ..... वगैरे वगैरे... असे शब्द ओळखीच्या आवाजात कानावर पडत होते. माझं मन मात्र भाषणाचा गाभा आठवत होत. सरांनी महावीरच नाव घेतले अन तो कागद खिशात घालून पुढे गेला. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम स्पष्ट दिसत होता. त्याने सुपेकर सरांकडे पाहिलं आणि शांत उभा राहिला...!

       अध्यक्ष, महाशय.... अं.. एवढेच म्हणून तो थांबला मान खाली घातली. सुपेकर सर त्याच्याकडे पाहतच होते. त्याच्या मनातील चलबिचल दिसत होती.  मान वर करून त्याने पुन्हा भाषण सुरु केले.

       अध्यक्ष, महाशय,  गुरुजनवर्ग आणि येथे उपसलेल्या  माझ्या बालमित्रोंनो... आणि सगळा हास्यकल्लोळ झाला.., सगळी मुले हसू लागली. शिक्षकही खूप हसले. बराच वेळ हसण्याचाच प्रोग्राम चालू राहिला. महाविरला मात्र काय झाले हे क्षणभर कळलेच नाही. सुपेकर सर हसत  त्याच्याजवळ आले आणि त्याच्या कानाला धरून ओढले आणि त्याला पुढेच बसवले. सरांनी आता माझे नाव घेतले आणि पळत पुढे जावून भाषणासाठी उभा राहिलो.. मीही सुरुवात केली.

      अध्यक्ष, महाशय, पूज्यगुरुजन..! एवढे बोलताच सरांनी माझ्याकडे हसून पाहिले आणि थांबवले  "असू दे, जा खाली बस.! " म्हणाले.

      महावीरमुळे उरलेल्या सर्व मुलांची भाषणे रद्द झाली आणि फक्त पाहुण्यांचे भाषण होऊन कार्यक्रम संपला. उरलेला दिवस सुट्टी जाहीर झाली.

Thursday, December 1, 2011

कष्टाची किंमत द्या !

                 एकविसावे शतक आणि त्यातले दुसरे दशक, 'भारत हा कृषिप्रधान देश' असे म्हणण्याचे दिवस राहिले नाहीत आता ! ज्या देशात शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते तो देश म्हणायलाच फक्त कृषिप्रधान? आता काळ खूप बदलला आहे. स्वातंत्र्यानंतर शेती हा नापासांचा व्यवसाय बनला आणि मोठ्या घरात 'शेतकरी नवरा नको ग बाई!' असे उद्गार काणी पडले. शिक्षण क्षेत्रातील अपुऱ्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण तरुण लोक शेतीवर लक्ष केंत्रीत करू लागले. त्यामुळे मिळाल्या उत्पन्नावर व्यवहारिक नफा-तोटा मोजणे ग्राह्य नसे. फक्त 'काय र, सिरपा..?', 'काय नाय सावकार.. तुमी म्हनचाल तसं..' हे चित्र पाहायला मिळायचं. आता तरुण शिकू लागले, पदवीधर झाले, व्यावहारिक ज्ञान त्यांना अवगत झाले आणि शेतकरी मोकळा श्वास घेऊ लागला. शेतकऱ्याच्या मागच्या पिढीने संस्थाचे जाळ विणल आणि आजच्या पीढीन इंजिन आणि इलेक्ट्रिक पम्प आणले. ज्या लोकांनी मागच्या काळात पुरेशी मदत जोपासली त्यांना सहकार महर्षी, लोकनेते पदवी बहाल केली. पसतीस वर्षापासून उसाचे पिक जोमाने अर्थव्यवहार करते आहे पण कुठे तरी गफलत होत होती. तंत्रज्ञानाचा शेतीवर परिणाम होतोय हे आता डोळ्यांना दिसत होते. उसाच्या आंदोलनाने हे डोळ्यासमोर आले. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला पुरेसा भाव मिळावे म्हणून यापूर्वीही काही शेतकरी गट पुढे आले होते, पण त्यावेळी सामाजिक आणि राजकीय दबावामुळे पुढे तो टिकला नाही, कारण शेतकरी संघटना सहकार क्षेत्र मोडीत काढायला निघाले आहे असे आरोप झाले. 

                 परंतु, तिसऱ्या पिढीत मात्र हे लोकनेते  स्वतःच तुपाशी खाऊ लागले,  त्यांचे गाड्या, अलिशान बंगले, त्यांचे राहणीमान, जीवनशैली सामान्य माणसाच्या डोळ्यात खपू लागले कारण हे सर्व सहकार डावलून शेतकऱ्याच्या पैशातून मिज्यास आहे यात तिळमात्र संशय नाही.   जे साखरसम्राट होऊन बसले आहेत  त्याचे पुतळे जाळले,   आंदोलने केली कारण काही राज्य आणि  जिल्हा  बँका कर्जात सापडल्या, सरकार  अडचणीत  आले.     उसाला, केळीला, कापसाला यासारख्या मुख्य पिकांना शेतकऱ्यांच्या समाधानकारक भाव मिळत नाहीय. हे दाखवून देण्यासाठी काही शेतकरी संघटना पुढे आल्या, यापूर्वी याच संघटना यात दोषी नाहीत हे सांगण्यातही यशस्वी झाल्या. संघटनांनी कारखान्यांचे अहवाल मागून, निवडून आलेल्या संचालकांशी चर्चा केली व ऊस दरात कशी वाढ होते हे सरकारला पटवून दिले. साखरेचे शेअर्सही शेतकऱ्यांना परवडतील असे झाले, असे चमत्कार मंत्री दाखवू शकले नाहीत. याच मंत्र्याचा स्वतःच्या फायद्यासाठी खाजगीकरणाला कसा विरोध आहे हेही पटवून दिले. 

          शेतकरी संघटना ऊसाला अवास्तव भाव मागत नाही, कारखान्याला टनामागे ४४५० रु. मिळतात, यामध्ये साखर उत्पादन प्रक्रियेत, खुल्या साखरेची किंमत, लेव्ही साखरेची किंमत, बग्यास, मळी, प्रक्रिया खर्च,केमिकल, वाहतूक खर्च, भांडवली व्यास व इतर खर्च सोडून, असे सर्व ५०% कारखान्याच्या  अनुराक्षणासाठी सोडता टनामागे २०५० रु दर पडतो. ऑस्ट्रेलियामध्ये ७०% ऊसाला भाव दिला जातो.संघटनांनी माहितीच्या आधाराखाली असा हिशोब करून कारखानदारी राजकारानांचा पर्दाफाश केला. दिवसाप्रमाणे ऊसाच्या प्रक्रियेतील सर्व गोष्टीची दरवाढ झाली पाहिजे. पूर्वी विरोधक हे सत्ताधारीशी भांडत पण आता विरोधक खाजगी कारखानदार बनले आहेत. त्यामुळे अशा शेतकरी संघटनांचा उगम होणे याची गरज होती. यामुळे शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील.