Tuesday, January 25, 2011

राजे तुम्ही...!

राजे तुम्ही...!
 भूमीत या होऊन गेला एक मराठ-मावळा,
आजही काना-कोपरा सह्याद्रीचा कडाडला ,
पाहून या युगाला,
राजे तुम्ही पुन्हा या जन्माला,
राजे तुम्ही पुन्हा या जन्माला  |

महाराष्ट्र भूमीचा तूच एक युवा ,
जिजाऊमातेचा जणू राम-कृष्ण तू शिवा ,
या युगाला , गरज आहे बहुजानाला,
तुमचीच प्रतीक्षा आहे रयतेला,
राजे तुम्ही पुन्हा या जन्माला,
राजे तुम्ही पुन्हा या जन्माला |

ठेऊनी मातेचरणी माथा,
धरुनी ती तलवार हाता,
घेऊनी डोळ्यात तीच इच्छा,
सौख्य लाभेल बहुजना,
स्वराज्याला सुराज्यात रूपांतरा,
राजे तुम्ही पुन्हा या जन्माला,
राजे तुम्ही पुन्हा या जन्माला |